जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, 'या' महत्वाच्या टिप्स नक्की वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पेपर सोडविण्यासाठी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशी वेळ निश्चित करून घ्यावी, पण
दुपारचे जेवण जास्त केल्यास पेपर सोडविताना सुस्ती येऊ शकते, त्यामुळे असे अन्न टाळावे.

पुणे : जेईई मेन्स परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत. ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार असून, उर्वरीत दिवसात अभ्यास कसा करावा, यावर महत्त्वपूर्ण टिप्स एलन करियर इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक विभाग प्रमुख अरुण जैन यांनी दिल्या आहेत. 

जेईई अॅडवान्स परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येते. ज्यात प्रत्येक पेपर तीन तासांचा आहे. चांगल्या अभ्यासाबरोबरच परीक्षेचा भरपूर सराव देखील होणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसातून दोनवेळा पेपर सोडविण्याचा सराव केला पाहिजे. त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन शक्य होईल आणि मेंदूही त्याच पद्धतीने काम करेल.

'नीट'ला वेळ पडला अपुरा; 'ओएमआर'शीट भरण्यात विद्यार्थ्यांचा गेला वेळ!​

पेपर सोडविण्यासाठी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशी वेळ निश्चित करून घ्यावी, पण
दुपारचे जेवण जास्त केल्यास पेपर सोडविताना सुस्ती येऊ शकते, त्यामुळे असे अन्न टाळावे. अभ्यासासाठी २०१४ ते २०१९ च्या जेईई अॅडवान्सच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या आहेत. मॉक टेस्ट घेताना प्रत्येक विषयामध्ये जवळपास १७ ते १८ प्रश्न विचारले जातात. तसेच एक पर्याय बरोबर असणारे प्रश्न जवळजवळ काढून टाकले आहेत.

'भाई स्टाइल' बड्डे 'त्यांना' महागात पडला; पाच जणांवर गुन्हा दाखल​

पूर्णांक प्रकार, खालील जोड्या जुळवा, मॅट्रिक्स चे प्रकार आदी प्रकारे प्रश्न विचारले आहेत. जेईई अॅडवान्सच्या गेल्या काही परीक्षांमध्ये असे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत. त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे अचूकता वाढून गुण चांगले मिळतील. 

परीक्षेत तीन विषयांचे प्रश्न असतात, प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त ५५ मिनीटे वेळ देऊन प्रश्न सोडवावेत, त्यामुळे अवघड प्रश्न सोडविण्यासाठी काही वेळ शिल्लक राहू शकतो, असे जैन यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Tips for JEE Advance Exam 2020