उद्धाटनांचा धुमधडाका, अजित पवारांचे एकाच दिवशी १९ कार्यक्रम

अवघ्या पाच दिवसांनी महापालिकेची मुदत संपत असल्याने नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी सुमारे ५० कार्यक्रम शहरामध्ये होणार आहेत.
Ajit PawarBill
Ajit PawarBillSakal
Summary

अवघ्या पाच दिवसांनी महापालिकेची मुदत संपत असल्याने नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी सुमारे ५० कार्यक्रम शहरामध्ये होणार आहेत.

पुणे - अवघ्या पाच दिवसांनी महापालिकेची मुदत संपत असल्याने नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाच्या (Development Work) उद्घाटनांचा (Inauguration) धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी सुमारे ५० कार्यक्रम (Program) शहरामध्ये होणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एका दिवसात तब्बल १९ कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही कार्यक्रम होणार असल्याने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने विद्यमान नगरसेवक १५ मार्चपासून माजी नगरसेवक होणार आहेत. महापालिकेची निवडणूक लगेच एप्रिल- मे महिन्यात होणार की पावसाळा संपल्यानंतर दिवाळीत होणार याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही. तसेच राज्य सरकारने मंजुर केलेल्या विधेयकामुळे प्रभाग रचनाही बदलणार अशीही चर्चा सुरू झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. असे असताना विद्यमान नगरसेवकांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचे उद्घाटन घेऊन प्रभागामध्ये हवा तयार करण्यासाठी कंबर कसली आहे.

Ajit PawarBill
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा मेळच नाही

उद्यान, अग्नीशामक केंद्र, अभ्यासिका, खेळाचे मैदान, प्रसुतीगृह, बहुउद्देशीय हॉल, रस्त्याचा शुभारंभ, उड्डाणपूलाचा शुभांरभ यासह विविध प्रकारच्या विकास कामांचे उद्घाटन आपल्या पक्षाच्या नेत्याच्या हस्ते करण्यासाठी नियोजन पण नेत्यांच्या तारखा मिळत नसल्याने उद्‌घाटनाचे कार्यक्रम लांबणीवर पडले.

शनिवारी आणि रविवारी विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुट्टी असल्याने राज्यातील नेत्यांकडून विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी नगरसेवकांना वेळा देण्यात आल्या आहेत. रविवारी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्वे रस्त्याच्या उड्डाणपूलाच्या उद्घाटनासाठी वेळ दिला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी सुमारे सात कार्यक्रमांना वेळ दिली आहे. या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमात वाढ होऊ शकेल, असे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.

अजित पवारांचे १२ तासात १९ कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.१३) राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी संपूर्ण दिवस दिला आहे. सकाळी सहा वाजता बाणेर येथे पहिला कार्यक्रम घेणार आहेत, त्यानंतर वारजे, भारती विद्यापीठ, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कोंढवा, वानवडी, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात शेवटचा सात वाजता कार्यक्रम होणार आहे. दिवसभरात १९ ठिकाणी कार्यक्रम घेऊन सुमारे २७ उद्घाटने अजित पवार करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com