महापालिकेने घेतलेल्या निर्णयांमुळे मिळकत करातून मिळाले एवढे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 March 2021

संकटाच्या काळात संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यास नागरिकही प्रतिसाद देतात आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढते, याचा अनुभव पुणे महापालिका घेत आहे. त्यामुळे मिळकत कराच्या उत्पन्नात गेल्या चार वर्षांत भरघोस वाढ झाली आहे. कोरोनामुळे आर्थिक आघाडीवर बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या निर्णयांमुळे २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मिळकत करातून १,४२४.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले.

पुणे - संकटाच्या काळात संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यास नागरिकही प्रतिसाद देतात आणि महापालिकेचे उत्पन्नही वाढते, याचा अनुभव पुणे महापालिका घेत आहे. त्यामुळे मिळकत कराच्या उत्पन्नात गेल्या चार वर्षांत भरघोस वाढ झाली आहे. कोरोनामुळे आर्थिक आघाडीवर बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या निर्णयांमुळे २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मिळकत करातून १,४२४.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले. यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांतच पुणे महापालिकेने मिळकत कर संकलनातील गेल्या सहा दशकांतील उच्चांक गाठला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळकत करातून येणारे उत्पन्न घटण्याची शक्यता होती. अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे नियमित करदात्यांकडे मिळकतकरासाठी तगादा लावणे उचित नव्हते. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये मिळकतकर भरण्याची मुदत जूनअखेरपर्यंत वाढविण्याचा; तसेच थकबाकी भरणाऱ्यांना ८० टक्के दंड माफ करणारी ‘अभय योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या या संवेदनशील भूमिकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकट्या अभय योजनेतूनच सुमारे ४८५.६१ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून करदात्यांची यादी अद्ययावत करण्यासोबतच ऑनलाइन कर भरण्यासाठी निर्दोष प्रणाली उपलब्ध करून दिल्याचा उत्पन्नवाढीस फायदा झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ५ लाख ३६ हजार करदात्यांनी मिळकतकर ऑनलाइन भरला आहे. ‘डिजिटल इंडिया’ ही संकल्पना महापालिकेच्या पातळीवर रुजत आहे आणि करदात्यांनाही तिचा वापर सोयीचा असल्याचे दिसून येत आहे.

पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक 

प्रामाणिक करदात्यांचा सन्मानासाठी महापालिकेने एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधीत निवासी मिळकतकर भरलेल्या करदात्यांना २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या मिळकत करात (राज्य शासनाचे कर वगळता) १५ टक्के सवलत जाहीर केली आहे. तब्बल साडेचार लाख निवासी मिळकतधारकांना प्रति मिळकत १,२०० ते १,५०० रुपयांची सवलत यातून मिळणार आहे.

महापालिकेचे निर्णय 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळकतकर भरण्यासाठीची वाढविलेली मुदत  थकबाकीदारांचा ८० टक्के दंड माफ करत राबविलेली ‘अभय योजना’ वेळेत कर भरणा करणाऱ्या निवासी मिळकतधारकांना पुढील वर्षातील करात जाहीर केलेली १५ टक्के सवलत 

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात

  • १०.६ लाख - पुणे महापालिका हद्दीतील कराच्या कक्षेत असलेल्या एकूण मिळकती
  • ७.६१ लाख - फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकती
  • ७० टक्के - ऑनलाइन मिळकतकर भरणाऱ्यांचे प्रमाण
  • ४८५.६१ कोटी - ‘अभय योजने’तून मिळालेले उत्पन्न

विकासकामे वेगाने मार्गी लावण्यासाठी उत्पन्नाची बाजू भक्कम लागतेच. ती भक्कम करतानाच नागरिकांनाही दिलासा देण्यासाठी महापालिकेने ८० टक्के दंड माफ करून थकीत मिळकत कर भरण्यासाठी ‘अभय योजना’ लागू केली. पुणेकरांनीही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. प्रामाणिक करदाते ही ओळख पुणेकरांनी दृढ केली आहे आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. 
- गणेश बिडकर, सभागृह नेते, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income from income tax due to decisions taken by the corporation