निर्यात वाढीमुळे बासमती तांदळाला तेजी; प्रती क्विंटल मागे 'एवढी' वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

दरवर्षी भारतातून पारंपारिक बासमतीची निर्यात युरोप आणि युरोपीयन देशांमध्ये होते. तसेच ११२१,१४०१,१५०९ या बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने इरान, इराक, दुबई, बाहरीन, साऊदी याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच सरबती व सुगंधा तांदुळाची निर्यात हे आफ्रीकन देशांमध्ये होत आहे. सध्या जगभरातील या देशासह अनेक देशांनी देशातील तांदळाचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने भारतातली तांदळाच्या खरेदीला पसंदी दिली आहे. ​

मार्केट यार्ड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातील प्रत्येक देशाने खाद्यान्न वस्तूंचा साठा वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यात भारतातून बासमती व इतर तांदळाची निर्यात जवळपास २० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे बासमती तांदळामध्ये १० टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. दर्जानुसार एका क्विंटलमागे साधारणतः ७०० ते ९०० रुपये दर वाढ झाली आहे.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी भारतातून पारंपारिक बासमतीची निर्यात युरोप आणि युरोपीयन देशांमध्ये होते. तसेच ११२१,१४०१,१५०९ या बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने इरान, इराक, दुबई, बाहरीन, साऊदी याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच सरबती व सुगंधा तांदुळाची निर्यात हे आफ्रीकन देशांमध्ये होत आहे. सध्या जगभरातील या देशासह अनेक देशांनी देशातील तांदळाचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने भारतातली तांदळाच्या खरेदीला पसंदी दिली आहे. मागणी वाढल्याने ११२१ व १४०१ तांदुळामध्ये स्टीम व सेला प्रकारामध्ये साधारण ६०० ते ९०० रुपये वाढ झाली आहे . तसेच सरबती व सुगंधामध्ये ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

देशातील हॉटेल व्यवसाय अद्याप पूर्णत : सुरु झालेला नाही. तसेच लग्नकार्यामध्ये सिमीत संख्यांचे नियम आहेत. तसेच श्रावण महिन्यामध्ये मांसाहाराचा कमी खाणे कमी होते. त्यामुळे बिर्याणीच्या खपामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे देशातील तांदळाची मागणी तुलनेने कमी आहे. तांदळाचा नवीन हंगाम सुरु होण्यास अद्याप ५ महिने बाकी आहेत. येणाऱ्या हंगामासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर येईल. शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल असे बाठिया यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

तांदळाचे घाऊक बाजारातील क्विंटलचे भाव 
पारंपारिक बासमती - ९००० ते १००००
११२१ बासमती - ८००० ते ८५००
१४०१ बासमती -७००० ते ७५०० 
सुगंधी बासमती - ६००० ते ६५०० 
सरवती बासमती - ५००० ते ५५०० 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

तांदळाची एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत एकूण झालेली निर्यात 
बासमती - ३२,९८,४४१.४२ मॅट्रीक टन 
नॉन बासमती - ४०,१४,९०८.३७ मॅट्रीक टन 
 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase 700 to 900 rupees per quintal in basmati rice due to increase in exports