आरोग्यावर खर्च वाढावा - डॉ. शशिकांत अहंकारी

सेनापती बापट रस्ता - नातू फाउंडेशनच्या बळवंत नातू आणि सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्काराचे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी (डावीकडून) मंदार देशपांडे, डॉ. अहंकारी, डॉ. आशिष सातव, डॉ. कविता सातव, चंद्रशेखर यार्दी.
सेनापती बापट रस्ता - नातू फाउंडेशनच्या बळवंत नातू आणि सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्काराचे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी (डावीकडून) मंदार देशपांडे, डॉ. अहंकारी, डॉ. आशिष सातव, डॉ. कविता सातव, चंद्रशेखर यार्दी.

पुणे - देशातील वैद्यकीय सेवांच्या किमतीचे प्रमाणीकरण झाल्यास दरांमध्ये असलेली मोठी तफावत कमी होईल, त्यासाठी देशात वैद्यकीय आस्थापना कायदा (क्‍लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्‍ट) लवकरात लवकर होण्याची गरज आहे. जीडीपी प्रमाणात सरकारी शिक्षण व आरोग्य सेवांवरील खर्चाच्या तरतुदीचे प्रमाण वाढवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शशिकांत अहंकारी यांनी व्यक्त केले.

नातू फाउंडेशनतर्फे मेळघाटातील डॉ. आशिष व डॉ. कविता सातव यांना ‘बळवंत नातू’, तर वर्धा येथील मंदार देशपांडे यांना सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार डॉ. अहंकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. नातू फाउंडेशनचे विश्वस्त दत्ता टोळ व चंद्रशेखर यार्दी उपस्थित होते. 

डॉ. अहंकारी म्हणाले, ‘‘देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणात सध्या शिक्षण व आरोग्य सेवांवरील खर्चाचे प्रमाण १.१ टक्के आहे, ते किमान पाच टक्के असायला हवे. देशातील ८० टक्के उपचार खासगी दवाखान्यात होतात. मात्र, खासगी आरोग्य सेवा अनियंत्रित असून, त्यांच्या दरांचे प्रमाणीकरण व्हावे.’’

डॉ. आशिष सातव यांनी मेळघाटमध्ये गेल्या वीस वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती दिली. गावपातळीवरील प्रशिक्षित आरोग्यसेवकांमुळे निवडक गावांमधील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. कविता सातव यांनी आदिवासी रुग्णसेवेचे अनुभव कथन केले. शिक्षणातून आत्मविश्वास तयार होणे गरजेचे आहे, असे मंदार देशपांडे म्हणाले. 
कार्यक्रमात नातू ट्रस्टतर्फे स्वरूपवर्धिनी, पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि श्री संतसेवा संघ- पुणे, भारत जोडो युवा अकादमी- नांदेड, डॉ. हेडगेवार रक्तपेढी- अकोला, ज्ञानप्रबोधिनी- सोलापूर व दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान- बीड, श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर- धुळे व पुणे या संस्थांना देणगी देण्यात आली. अनंता टोळ यांनी प्रास्ताविक केले. फाउंडेशनचे विश्‍वस्त विवेक गिरिधारी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com