मुळशी, जुन्नर, हवेलीत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

पुणे जिल्ह्यातील मुळशी, जुन्नर, हवेली या तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुळशीत सातशे, तर जुन्नरमध्ये पाचशेपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. हवेलीत एकाच दिवसात शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी, जुन्नर, हवेली या तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुळशीत सातशे, तर जुन्नरमध्ये पाचशेपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. हवेलीत एकाच दिवसात शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

मुळशीत 715 कोरोनाबाधित
पिरंगुट :  मुळशी तालुक्‍यात कोरोनाबाधितांच्या संख्येने आता सातशेचा आकडा पार केला आहे. तालुक्‍यात आज नवीन 20 रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या आता 715 झाली आहे. हिंजवडी येथे आठ, चांदे तीन, नेरे तीन, कासारसाई व भूगाव प्रत्येकी दोन आणि सूस व आंबडवेट येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 56 जणांना दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. तालुक्‍यात आतापर्यंत मृतांची संख्या 22 झाली आहे. सध्या 135 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी तीन रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई
  
जुन्नरने गाठला पाचशेच्या टप्पा 
जुन्नर : जुन्नर तालुक्‍यात कोरोनाबधितांच्या संख्येने पाचशेच्या टप्पा गाठला. गुरुवारी जुन्नर शहर-2, आळे, बेल्हे, साकोरी, ओतूर, नारायणगाव व हिवरे तर्फे नारायणगाव प्रत्येकी एक असे आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्‍यातील एकूण रुग्ण संख्या 498 झाली आहे. 21 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेले 126 रुग्ण असून 351 रुग्ण बरे झाले आहेत. 

हवेलीमध्ये आणखी 103 जण रुग्ण 
केसनंद : हवेली तालुक्‍यात दिवसभरात 103 जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लोणीकंद येथील पुण्यात उपचार घेतलेत असलेल्या एका 57 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला. कोरोनामुक्त झाल्याने 70 जणांना घरी सोडण्यात असल्याचे सहायक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले. आळंदी म्हातोबा येथे 1 रुग्ण, आव्हाळवाडी 3, देहू 12, फुलगाव 2, हांडेवाडी 2, होळकरवाडी 1, कदमवाक वस्ती 13, केसनंद 2, किरकटवाडी 3, कोंडवे धावडे 12, कुंजीरवाडी 1, लोणीकंद 6, मांजरी बुद्रूक 11, नांदेड 4, नऱ्हे 8, श्रीरामनगर 1, शेवाळवाडी-1, सोरतापवाडी 1, उरुळी कांचन 3, वडाची वाडी 2, वडकी 2 आणि वाघोलीत 12 रुग्ण आढळून आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased risk of corona disease in Mulshi, Junnar, Haveli taluka