esakal | इंदापूर कृषीप्रदर्शन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur agro Exibition will try to get first place in state says Chandrakant Patil

कृषी प्रदर्शन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

इंदापूर कृषीप्रदर्शन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने होत असलेले कृषी प्रदर्शन गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. प्रदर्शनातील घोडे बाजारामुळे बाजार समितीचा नावलौकिक राज्यात उंचावला असून बाजार समिती राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. हे कृषी प्रदर्शन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्याशिवलीलानगर मुख्य बाजार आवारात आयोजित कृषी महोत्सव 2020 अंतर्गत कृषी, जनावरे प्रदर्शन, घोडेबाजार व डॉग शोचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील होते. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, सभापती आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, मदन सिंह मोहिते पाटील, मयुरसिंह पाटील, पृथ्वीराज जाचक, उदयसिंह पाटील, भरत शहा, राजवर्धन पाटील, नानासाहेब शेंडे, मंगेश पाटील, महेंद्र रेडके, मारूतराव वणवे, अशोक वनवे, रामभाऊ पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आणखी वाचा : INDvsNZ : न्यूझीलंड संघ खेळणार कसा? दुखापतीने 'हे' चार महत्वाचे खेळाडू संघाबाहेर

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात स्थापन झालेले सरकार अनैसर्गिक असून सत्तेवर येऊन देखील चाचपडत आहे. सरकारमध्ये खाते, बंगले वाटप झाले, मात्र शेतकऱ्यांचे लक्ष विचलितकरण्या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जमाफीची फसवी घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा : नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण आहे पालकमंत्री

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, तालुक्यातील शेतकरी प्रगतशील असून प्रदर्शनातील आधुनिक ज्ञानामुळे शेतीमाल उत्पादकता वाढत आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनावर भर देणे गरजेचे आहे. यावेळी सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले,  बाजार समितीने मासे, डाळिंब, घोडे बाजारासाठी राज्यात नावलौकिक मिळवला असून शेतकरी सक्षमीकरणासाठी प्रदर्शन वरदान ठरले आहे. सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर तर आभार प्रदर्शन सचिन भाग्यवंत यांनी केले.

आणखी वाचा : मोदी, शहांच्या हत्येची धमकी; आरोपीस अटक

विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा फार थोड्या मताने पराभव झाला मात्र त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता त्यांना तसेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांना राज्यात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी आप्पासाहेब जगदाळे यांनी केली होती. त्याचा धागा पकडून त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे सुतोवाच चंद्रकांत पाटील यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

loading image