esakal | इंदापूर नगरपरिषदेमुळे तालुक्याचा लाैकिक वाढला, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

inda.jpg

इंदापूर नगरपरिषदेने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत हॅटट्रिक संपादन केल्यामुळे शहराच्या नावलौकिक व वैभवात भर पडली आहे.

इंदापूर नगरपरिषदेमुळे तालुक्याचा लाैकिक वाढला, कारण...

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेने देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत हॅटट्रिक संपादन केल्यामुळे शहराच्या नावलौकिक व वैभवात भर पडली आहे. याचे संपूर्ण श्रेय तमाम इंदापूरकरांच्या नियोजन व मेहनतीस आहे.

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

शहरातील शाळा, नागरिक, व्यापारी, समाजसेवी संस्था, मंडळे, महाविद्यालय, नगरपरिषद कर्मचारी यांनी त्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वच्छ, सुंदर व हरित इंदापूर या संकल्पने अंतर्गत यापुढे देखील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची ग्वाही इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.

इंदापूर शहराला स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी देशपातळीवर मानांकन मिळाल्याने टाऊन हॉल सभागृहात इंदापूरकरांप्रती आयोजित कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंकिता शहा पुढे म्हणाल्या, ''स्वच्छता चळवळ निरंतरपणे सुरू ठेवून देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, मात्र त्या साठी आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.'' 

मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, ''स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला कमी गुण मिळाले आहेत, ते वाढण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करू.''

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

पुढील स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अचूक नियोजन, तंत्रशुद्ध माहितीच्या आधारे शहरास प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करु असे आवाहन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी यावेळी केले.

यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी या अभियानातील अनुभव व्यक्त केले. यावेळी नगरसेवक भरत शहा, नगरसेविका मीना ताहीर मोमीन, जावेद शेख, नितीन मखरे, रमेश धोत्रे, हमीद आत्तार उपस्थित होते. सुत्रसंचालन अल्ताफ पठाण तर आभार श्रद्धा वळवडे यांनी मानले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top