पाटील कारखान्याचे सोमवारी उच्चांकी ९७७५ मे.टनाचे गाळप - हर्षवर्धन पाटील

क्षमता प्रतिदिनी ८ हजार मे. टन असताना कारखान्याने एका दिवसात उच्चांकी म्हणजे ९७७५ मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले.
पाटील कारखान्याचे सोमवारी उच्चांकी ९७७५ मे.टनाचे गाळप
पाटील कारखान्याचे सोमवारी उच्चांकी ९७७५ मे.टनाचे गाळप Sakal

इंदापूर : महात्मा फुलेनगर ( बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामात सोमवारी दि.१३ या एकदिवसामध्ये उच्चांकी ९७७५ मे.टन ऊसाचे गाळप करून अभिमानास्पद कामगिरी केली असल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा कारखाना अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

श्री. पाटील पुढे म्हणाले, कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ८ हजार मे. टन असताना कारखान्याने एका दिवसात उच्चांकी म्हणजे ९७७५ मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले. याचे श्रेय ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार,कंत्राटदार मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी,कर्मचारी यांना आहे. कारखान्याने आज अखेर २ लाख ६१ हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असून कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल प्रकल्प, बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मिती आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत.

पाटील कारखान्याचे सोमवारी उच्चांकी ९७७५ मे.टनाचे गाळप
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? बार परवान्याप्रकरणी Excise ची नोटीस

चालू हंगामात गाळप ऊसास प्रति टन रु. २५०० पेक्षा जास्त (प्लस ) दर दिला जाणार असून शेतकऱ्यांना पहिला हप्ता प्रति टन रु.२१०० प्रमाणे नियमित अदा केला जात आहे.चालू हंगामामध्ये सुमारे १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट कारखाना निश्चितपणे पुर्ण करेल, असा विश्वास अध्यक्ष हर्षवर्धनपाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.

यावेळी हनुमंत जाधव,शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com