Indapur: शॉर्ट सर्किट मुळे ११ शेतकऱ्यांच्या ऊसाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊसाला आग

इंदापूर : शॉर्ट सर्किट मुळे ११ शेतकऱ्यांच्या ऊसाला आग

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मौजे अवसरी येथील अकरा शेतकऱ्यांच्या ऊसास शुक्रवार दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळेअचानक आग लागली.यामध्ये प्रामुख्याने गोरख तावरे ,प्रकाश गायकवाड, कल्याण शिंदे, हरिदास शिंदे, संभाजी बोंगाणे या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले. यावेळी पस्तीस एकर ऊस या आगीत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे असून नुकसानझाले.कर्मयोगी कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे यांनी घटनास्थळी शेतकऱ्यांची भेट घेतली.

भर दिवसा दुपारी हे अग्नी तांडव झाल्यामुळे आगीचा भडका थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी व ग्रामस्थ मदतीस धावले. मात्र आगीच्या लोटांमुळे प्रयत्न कमी पडले.अग्निच्या ज्वाला व धूर मोठ्या प्रमाणात होता,त्यास मोकळ्या वाऱ्याची साथ मिळाल्याने आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे इंदापूर तालुका खजिनदार अंगद तावरे यांनी प्रसंगावधान राखून इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक, कर्मयोगी कारखाना उपाध्यक्ष भरत शहा यांना फोन करताच इंदापूर नगरपरिषद व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब आले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

त्यांच्या संयुक्त फवाऱ्यामुळे अखेर ही आग आटोक्यात आली. या घटनेत जीवित हानी झाली नाही मात्र वित्तहानी झाली. दरवर्षी शॉर्ट सर्किट मुळे आग लागून शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेला ऊस जळून शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्या साठी भरारी वीज मंडळाने भरारी पथक नेमणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी बाधित शेतकरी प्रकाश गायकवाड म्हणाले,या अग्निकांडामुळे चार ते पाचएकर ऊस जळून खाक झाला असून शासनाने त्याचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. जीवापाड जपलेला ऊस जळून खाक झाल्याने दुःखझाले.शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटास देखील तोंड द्यावे लागते.

loading image
go to top