इंदापुरातील 'एवढ्या' विद्यार्थ्यांना मिळाली मंदीत नोकरीची संधी

डॉ. संदेश शहा
Saturday, 22 August 2020

विद्या प्रतिष्ठान तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ऑनलाईन मुलाखतीद्वारे तब्बल ४१ विद्यार्थ्यांना थेट नोकरी तर ग्लोबल टॅलेंट ट्रकच्या सहकार्याने १६१ विद्यार्थ्यांना व्यावसायिक व रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करणाऱ्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

इंदापूर (पुणे) : कोरोना महामारीमुळे सर्व क्षेत्रात मंदीचे सावट असतानाही इंदापूर विद्या प्रतिष्ठान तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ऑनलाईन मुलाखतीद्वारे तब्बल ४१ विद्यार्थ्यांना थेट नोकरी तर ग्लोबल टॅलेंट ट्रकच्या सहकार्याने १६१ विद्यार्थ्यांना व्यावसायिक व रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करणाऱ्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर. ए. वीर यांनी दिली.

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

प्राचार्य वीर पुढे म्हणाले, भारत फोर्ज प्रा. लि, पिआयजिआे व्हेईकल प्रा. लि, जयश्री पॉलिमर प्रा. लि, जॉन डीरे इंडिया प्रा. लि, के एस बी प्रा. लि, बडवे इंजीनियरिंग प्रा. लि, स्पॅको टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि, कमिन्स इंडिया प्रा. लि या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना मंदीच्या काळात नोकरी मिळवून देऊन तंत्र निकेतनचा असणारा लौकिक कायम ठेवला आहे.

मेट्रो, पुरंदर विमानतळासह रखडलेली विकासकामे मार्गी लावा- अजित पवार

 
दर्जेदार शिक्षणासोबत नोकरी व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात तंत्रनिकेतन अग्रेसर असल्याने विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीला प्रवेश घेताना पहिली पसंती विद्या प्रतिष्ठान तंत्रनिकेतनला देत असल्याचे प्रा. अमोल जगताप यांनी सांगितले. प्रतिष्ठान तंत्रनिकेतन हे विद्यार्थ्यांना उच्चतम व्यावसायिक शिक्षण देण्यात नेहमीच अग्रेसर असल्याने या तंत्रनिकेतनमधील विद्यार्थांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचा तंत्रनिकेतनचा आलेख नेहमी चढता असल्याचे तसेच यापुढेही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याची माहिती ट्रेंनिग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. योगेश जाधव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur students get job opportunities in recession