'उजनी'च्या मुळ नियोजनास धक्का न लावता मिळणार इंदापूरला पाणी

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
ujani
ujani Sakal Media

वालचंदनगर : उजनी धरणाच्या मूळ पाणी वाटपाच्या नियोजनास धक्का न लागता इंदापूर तालुक्याला पुणे  व पिंपरी शहरातून उजनी जलाशायामध्ये वाहून येणारे सुमारे ५ टीएमसी सांडपाणी शेतीच्या सिंचनासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणले यांनी दिली.

खडकवासला धरण साखळी मधील एकूण पाणी साठा २९.१५ टीएमसी असून या पाण्याचा वापर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी होतो.  यातील सुमारे २० टीएमसी  सांडपाणी मुळा-मुठा नदीमधून उजनी जलशायामध्ये वाहून येत असते. खडकवासला धरण साळखीचे बहुतांश पाण्याचा उपयोग पिण्‍याच्या पाण्यासाठी होत असल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मिळत नाही. इंदापूरमधील शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याने  पुणे व पिंपरी शहरामधून वाहून येणारे सुमारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूरसाठी देण्याची सदरची उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे उजनी जलाशयातून  ५ टीएमसी पाणीउचलून खडकवासल्याच्या शेटफळगढे जवळील कालव्यामध्ये सोडण्यात येणार आहे.  सणसर कट मधून नीरा डाव्या कालवा व खडकवासल्याच्या कालव्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. वर्षभरामध्ये खरीप पिकांसाठी एक वेळा, रब्बी साठी दोन वेळा व उन्हाळी हंगामासाठी एक वेळा असे चार वेळा उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर तालुक्यातील सुमारे ६३ हजार एकर क्षेत्राला होणार आहे.

ujani
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यासाठी ५ टीएमसी वाढीव पाण्याची तरतुद केली असल्याने इंदापूरकरांनी तोफांच्या सलामी देवून तसेच गावोगावी साखर वाटून निर्णयाचे स्वागत केले. मात्र इंदापूर तालुक्याला उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी मिळणार असल्याने उजनीच्या पाणीवाटपामध्ये फेरबदल करण्यात आल्याची अफवा पसरली आहे. सोलूपरचे हक्काचे पाण्यावर गदा आल्याची अफवा पसरली असून सोलापूर जिल्हामध्ये आंदोलने होवू लागली आहेत. मात्र उजनीच्या मुळ पाणी वाटपाच्या नियोजनला धक्का न लावता इंदापूर तालुक्याला पाणी मिळणार आहे.

उजनी धरणाची एकूण पाण्याची क्षमता - ११७ टीएमसी.

मृत साठा - ६३.६६ टीएमसी.

वापराचा पाणी साठा- ५३.५७ टीएमसी.

उजनी धरणाचे पाणी वाटप खालीलप्रमाणे...

आकडे टीएमसीमध्ये ( २०१८ नूसार)

भीमा ( उजनी) प्रकल्प प्रवाही क्षेत्र- ३४.५१

खासगी उपसा क्षेत्र -७.६३

सीना -माढा उपसा सिंचन योजना-४.७५

भीमा-सीना जोड कालवा- ३.१५

दहिगाव उपसा सिंचन योजना- १.८१

शिरापूर उपसा सिंचन योजना- १.७३

आष्टी उपसा सिंचना योजना - १.००

बार्शी उपसा सिंचन योजना -२.५९

एकरुख उपसा सिंचना योजना- ३.१६

सांगोला उपसा सिंचन योजना- २.००

लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजना- ०.५७

मंगळवेढा उपसा सिंचना योजना- १.०१

धरणातील बाष्पीभवन- १४.६८ (सर्वाधिक बाष्पीभवन २००८-०९)

पिण्यासाठीचा पाणीवापर- २.४९

औद्यागिक पाणीवापर- ३.२६

ujani
पुणे महापालिकेकडून १९ दिवसांत २५ लाखाचा दंड वसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com