इंडिया ऍक्‍टिव्ह' संघटनेची प्रशासनाकडे जिम उघडण्याची मागणी

India Active Association demands administration to open gym
India Active Association demands administration to open gym

पुणे : फिटनेस क्षेत्रातील उद्योजकांसाठी कार्यरत असलेल्या 'इंडिया ऍक्‍टिव्ह' संघटनेनी महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड राज्यातील जिम पुन्हा सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिम बंद असल्याने जिम चालक व व्यवसायाशी संबंधित लोकं आर्थिक संकटात सापडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिम बंद करण्यात आले असल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. तर अश्‍यात इतर व्यवसायांना ठराविक मार्गदर्शन तत्वे आखून आपापले व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून अद्याप जिम पुन्हा उघडण्याबाबत कोणतीच परवानगी नसल्याने जिम चालक, ट्रेनर तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची आर्थिक उत्पन्न 100 टक्के थांबले असल्याचे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

काय सांगता? पुणे विद्यापीठ चौकात रस्ता ओलांडायला लागतायेत 15-20 मिनिटे!

याविषयी संघटनेचे सरचिटणीस विकास जैन म्हणाले, " महाराष्ट्र, बिहार सारख्या प्रमुख राज्यांमध्ये मोठ्या संख्येने जिम व्यवसाय चालतो. दरम्यान या राज्यांमध्ये निर्बंध असल्याने लॉकडाऊनच्या या कठीण काळात अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन असूनही, सर्व जिम चालक, मालकांना भाडे, कर, पगार, वीजबिल आदी द्यावे लागतात. सध्या देशातील अनेक जिम चालकांनी आपले जिम कायमस्वरूपी बंद केले असून काहींना उत्पन्न नसल्याने आपल्या ट्रेनर व इतर कर्मचाऱ्यांचे पगार देणे अवघड झाले आहे.''

दरम्यान दिल्लीमध्ये जिम पुन्हा सुरू झाले असून 30 ते 45 टक्के लोकं जिमला जात आहेत. सध्या नागरिकांमध्ये जिम संदर्भात संभ्रम आहे. जिममध्ये गेल्यास संसर्ग होईल अशी मानसिकता लोकांनी बदलण्यासाठी प्रशासनाने देखील या व्यवसायकांना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच जिम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने 10 ते 15 दिवस आधी याबाबत कल्पना द्यावी. त्यामुळे चालकांना तयारी करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. असे संघटनेचे खजिनदार निखिल कक्कर यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com