Avishan Patil: "पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध"; अविनाश पाटील यांचं प्रतिपादन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Avishan Patil: "पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध"; अविनाश पाटील यांचं प्रतिपादन

पुणे : पाश्चात्य विवेकवादी परंपरेपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा ही समृद्ध आहे. बुद्ध, चार्वाक, संत आणि सुधारकांची विवेकवादी परंपरा जैविक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेनं 'संतविचार, संविधानिक मूल्ये व विवेकवादी परंपरा' या विषयावर एकदिवसीय शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी ते बोलत होते. (Indian rationalist tradition richer than Western says MANIS Avishan Patil)

Avishan Patil: "पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध"; अविनाश पाटील यांचं प्रतिपादन
Maratha Reservation: 'पाणी प्या...पाणी प्या' समाजाची हात जोडून आर्त विनंती! जरांगे भावूक, घेणार चार घोट पाणी

भावना आणि विचारांचं प्रतिबिंब

माणसामध्ये भावना आणि विचारांचं मिश्रण आहे. भारतीय विवेकवादी परंपरेत देखील भावना आणि विचारांचं प्रतिबिंब आहे. त्यामुळं ती परंपरा मानवी जगणं उन्नत करण्यासाठी उपयुक्त आहे. पाश्चात्य विवेकवादी परंपरा ही अधिक तर्ककठोर आणि विचारांवर आधारलेली असल्यानं ती मनुष्याला बांधून ठेवण्यात कमी पडत आहे.

संत सुधारकांचा वारसा कालसुसंगतपणे समजून घेण्याची गरज आहे. तो समाज सुधारणेचा भाग आहे. तो समाज बदलाची प्रक्रिया म्हणून महत्वाचा आहे. संतांनी केवळ उपदेश केला नसून प्रश्न विचारण्याचा वारसा जपला आहे, असंही अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितलं.

Avishan Patil: "पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध"; अविनाश पाटील यांचं प्रतिपादन
Maratha Reservation: "मराठा आंदोलन भरकटलंय, जरांगेंनी विचार करावा"; CM शिंदेंचं आवाहन

संतांची मांडणी प्रभावी

संतांनी केलेली मांडणी ही आजच्या एकूणच धर्मांधतेला उत्तर देण्यास प्रभावी आहे, हे सप्रमाण सांगून अत्यंत सडेतोड, तर्कसुसंगत मांडणी दुसऱ्या सत्रात संत साहित्याचे अभ्यासक धम्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी केली.

जागतिक पातळीवर विज्ञान दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता तेव्हा 12 व्या शतकात भारतात संत परंपरेने भावनेला साद घालत तर्कशुद्ध आणि कार्यकारणभाव असलेली मांडणी केली. त्या काळच्या अंदाधुंदीला उत्तर दिले. तीच संतांची मांडणी आजच्या काळालाही उत्तर आहे, असं तिसऱ्या सत्रात गणेश महाराज फरताळे यांनी सांगितलं.

Avishan Patil: "पाश्चात्यांपेक्षा भारतीय विवेकवादी परंपरा समृद्ध"; अविनाश पाटील यांचं प्रतिपादन
Maratha Reservation: उपसमितीची बैठक संपली! 11,530 कुणबी नोंदी सापडल्या, उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

प्रत्येक सत्रानंतर प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यात आलं. संतविचार, संविधानिक मूल्ये विवेकवादी परंपरेची सांगड घालून प्राप्त परिस्थितीला उत्तर देता येईल असा आशावाद शिबिरार्थींकडून व्यक्त करण्यात आला. शिबीरातून जो संवाद घडला त्यातून वैयक्तिक व सामूहिक पातळीवर कृतीकार्यक्रम ठरला आहे.

विशाल विमल, मयूर पटारे, शीतल साठे, विनोद लातूरकर, स्नेहल लांडगे, प्रवीण खुंटे, योगेश्वरी भोसले, आकाश छाया, स्वप्नील भोसले, रविराज थोरात, रतन नामपल्ले, प्रिया आमले, प्रतीक पाटील यांचा गायन, परिचय, सुत्रसंचलन, संयोजनात सहभाग होता. सचिव शाम येणगे यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com