भारतीय शास्त्रज्ञ देतायेत कोरोनाला फाईट; पुण्यातल्या 'एनसीसीएस'चाही सहभाग

Indian scientists will develop monoclonal antibodies for the treatment of corona
Indian scientists will develop monoclonal antibodies for the treatment of corona

पुणे : कोरोनावरील उपचारासाठी 'मोनोक्‍लोनल अँटीबॉडी' विकसित करण्याची योजना भारतीय शास्त्रज्ञांनी हाती घेतली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर) वतीने हाती घेण्यात आलेल्या न्यू मिलेनियम इंडियन टेक्‍नॉलॉजी लीडरशिप इनिशीएटीव या मोहिमे अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इस्राईल आणि नेदरलॅंडच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच अशा प्रकारच्या मोनोक्‍लोनल अँटीबॉडी विकसीत केल्याचा दावा केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोविड-19च्या उपचारासाठी अधिक प्रभावी उपचार पद्धती शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी ही मोहिम हाती घेतली आहे. तसेच, भविष्यात कोविड-19मध्ये म्यूटेशनला रोखण्यासाठीही या पद्धतीचा विचार करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत मानवी मोनोक्‍लोनल अँटीबॉडीजचे क्‍लोन प्रयोगशाळेत विकसित करण्यात येणार आहे. विकसीत करण्यात आलेले या अँटीबॉडी कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. सीएसआयआरची पुण्यातील प्रयोगशाळा राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस), इंदोर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआटी) या संस्थांचा संशोधनामध्ये सहभागी आहे. प्रयोगशाळेतील संशोधन तातडीने लोकांच्या उपयोगात यावे यासाठी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि प्रीडॉमिक्‍स टेक्‍नॉलॉजी यांसोबत सहकार्य करारही करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहेत मोनोक्‍लोनल अंटीबॉडी? 
- प्रयोगशाळेत विकसित करण्यात प्रतिजैविक कृत्रीम प्रथिने 
- विषाणूला विरोध करणाऱ्या प्रतिजैविक पेशींसारखेच कार्य करते 
- या प्रथिनाचे क्‍लोनिंगच्या साहाय्याने प्रयोगशाळेत पुर्नउत्पादन करण्यात येते 


प्रत्येकाच्या 'डीपी'वर झळकतायत महाराष्ट्र पोलिस; काय आहे कारण?

अशी होते निर्मिती 
- विशिष्ट आजारासाठी प्रतिजैविक म्हणून कार्य करणाऱ्या पेशींची निवड करण्यात येते 
- या पेशींची पुनरुत्पादन करणाऱ्या माईलोमा पेशींसोबत सांगड घालण्यात येते 
- उंदरातील "बी'पेशी आणि पॉलिथीलीन गायकॉलच्या साहाय्याने प्लाझ्मा मेंबरेनसोबत एकत्रीकरण 
- तयार झालेले कल्चर हॅट मिडीयममध्ये विकसित करण्यात येते 
- प्रयोगशाळेतील निरीक्षणानंतर विकसित मोनोक्‍लोन अँटीबॉडी मिळविण्यात येतात 


कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...


उपयोग 
- प्रयोगशाळेत विकसित मोनोक्‍लोनल ऍटीबॉडी विषाणूला जाऊन चिकटतात 
- त्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होते आणि विषाणूचा प्रसार रोखला जातो 
- म्यूटेशन झालेल्या विषाणूला रोखण्यासाठीही प्रभावी 


कोरोनाला रोखण्यासाठी देशभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहे. सीएसआयआरच्या वतीनेही यासाठी एक समग्र कार्यक्रम तयार केला आहे. कोविड-19 विरोधात उपलब्ध सर्व उपचार पद्धतींवर शास्त्रज्ञ कार्य करत आहे. सुरवातीच्या टप्प्यात असलेल्या या संशोधनातूनच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. 
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर 

मनसे, भाजपमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा ! कोल्हापूर, जळगावला चार बस रवाना

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहे. सीएसआयआरच्या वतीनेही यासाठी एक समग्र कार्यक्रम तयार केला आहे. कोविड-19 विरोधात उपलब्ध सर्व उपचार पद्धतींवर शास्त्रज्ञ कार्य करत आहे. सुरवातीच्या टप्प्यात असलेल्या या संशोधनातूनच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. 
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, सीएसआयआर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com