इंद्रायणी, सोलापूर एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांची आसनक्षमता वाढली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

मुंबई-पुणे इंद्रायणी आणि पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेसचे रूपांतर "लिंक हाफमन बुश्‍च' (एलएचबी)  कोचमध्ये झाल्यामुळे दिव्यांगांसह प्रवासीक्षमतेत वाढ झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले. एक फेब्रुवारीपासून या दोन्ही गाड्यांचे रूपांतर "एलएचबी'मध्ये झाले आहे.

पुणे - मुंबई-पुणे इंद्रायणी आणि पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेसचे रूपांतर "लिंक हाफमन बुश्‍च' (एलएचबी)  कोचमध्ये झाल्यामुळे दिव्यांगांसह प्रवासीक्षमतेत वाढ झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले. एक फेब्रुवारीपासून या दोन्ही गाड्यांचे रूपांतर "एलएचबी'मध्ये झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंद्रायणी एक्‍स्प्रेस (क्र. 22105-22106) आणि पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस (क्र. 12169, 12170) या दोन्ही गाड्या एलएचबी कोचमध्ये रूपांतरित झाल्यामुळे आसनक्षमतेत वाढ झाली; तसेच खिडक्‍याही रुंद झाल्या आहेत. आसनव्यवस्थाही रुंद झाली; तसेच प्रवाशांना डब्यात सहजपणे वावरता येते. या दोन्ही गाड्यांमध्ये यापूर्वी इंटिग्रल कोच फॅक्‍टरी (आयसीएफ) पद्धतीची व्यवस्था होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

इंद्रायणीमध्ये जनरेटर व्हॅनची पुनर्रचना केल्याने व्हॅनची आसनक्षमता 36 झाली आहे. त्यातील 30 आसने प्रवाशांसाठी; तर सहा आसने दिव्यांगांसाठी आहेत. दोन्ही गाड्यांतील डब्यात पूर्वी 108 आसने होती. "एलएचबी' कोचमध्ये रूपांतरित झाल्यानंतर आसनक्षमता 120 झाल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani Solapur Express has increased passenger capacity