esakal | पाळीव जनावरांना ‘लंपी’ आजाराचा संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

पाळीव जनावरांना ‘लंपी’ आजाराचा संसर्ग

पाळीव जनावरांना ‘लंपी’ आजाराचा संसर्ग

sakal_logo
By
राजेंद्र लोथे

चास : खेड तालुक्यातील पाळीव प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपी हा विषाणूजन्य आजार आढळून येत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने याचा फैलाव वेगाने होत आहे. देशी जनावरांबरोबरच खिल्लार जातीच्या जनावरांमध्ये याचा फैलाव वेगाने होत असल्याने देशी गायींचा सांभाळ करणारे व बैलगाडा मालक धास्तावले आहेत.

लंपी हा आजार बहुतेक शेळ्यामेंढ्यामध्ये दिसून येतो. पण, चालू वर्षी पहिल्यांदाच हा आजार खिल्लार जनावरे, दुभत्या गायी व देशी गायींमध्ये आढळून आल्याने पशुपालक धास्तावले आहेत.

हेही वाचा: Pune : एअरगन, पिस्तूल बाळगणाऱ्यांना अटक

आजाराची लक्षणे

या आजाराने जनावरांच्या अंगावर गाठी येत असून, त्या संपूर्ण अंगावर पसरतात. त्यामुळे जनावरे अशक्त होणे, सूज येणे; तर दुधाळ जनावरांमध्ये दुधाची कमतरता होऊन जनावरे वैरण खात नाहीत. काही कालांतराने शरीरावरील आलेले फोड फुटतात व त्याचा अन्य जनावरांमध्ये फैलाव होतो. वेळीच उपचार न केल्यास जनावरे दगावतात. याचा फैलाव हा डास, गोचीड, पाणवठ्यावर एकत्र पाणी पिल्यामुळे वा जनावरांच्या लाळेमधून व हवेतूनही प्रसार होतो. त्यामुळे जनावरे शेजारी बांधल्यानेही हा रोग अन्य जनावरांना पसरतो.

हेही वाचा: कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

"या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. ज्या जनावरांना हा आजार झाला आहे, त्यांचे विलगीकरण करणे व गोठा स्वच्छ असणे गरजेचे आहे. गोठ्यात चुना वा अन्य निर्जंतुकीकरण करावे. गोठ्यात बाहेरील जनावरे आणू नका. आजारी जनावरांना वैरण वा पाणी पाजल्यावर निरोगी जनावरांच्या गोठ्यात स्वच्छ होऊनच प्रवेश करा."

- बी. एम. ढुशिंग, पशुधन पर्यवेक्षक

"ज्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, अशी जनावरे या आजाराला बळी पडत नाहीत. शेळ्यामेंढ्यांसाठी असणारी लस जनावरांना दिली असता चांगले परिणाम दिसून आले. जेथे या आजाराने ग्रस्त जनावरे आहेत, त्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यास प्राधान्य दिले आहे."

- डॉ. ए. एस. चिखले, सहायक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन

loading image
go to top