लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेले विद्यार्थी घरी जाणार? २३०० जणांची माहिती प्रशासनाला सादर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

'सकाळ'ने विद्यार्थ्यांचे मानसिक, आर्थिक संकट तसेच कुटुंबीय ही चिंतेत असल्याचे बातम्यांमधून मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ही हा विषय उपस्थित करण्यात आला.

पुणे : केंद्र सरकारने शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिलेले असताना, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने शहरातील २ हजार ३०० विद्यार्थ्यांची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केली आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम काही प्रमाणात हलके होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुण्यात  हजारो विद्यार्थी अडकले आहेत. पुण्यात ३ मे नंतर ही नियम शिथील होण्याची शक्यता कमी असल्याने हे विद्यार्थी तणावाखाली आले. तसेच या विद्यार्थ्यांना भोजन देणार्या संघटनांची क्षमता ही संपत आली. त्यामुळे विद्यार्थी, संघटनांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून गावाकडे जाऊ द्यावे अशी मागणी केली होती.

- आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने...

'सकाळ'ने विद्यार्थ्यांचे मानसिक, आर्थिक संकट तसेच कुटुंबीय ही चिंतेत असल्याचे बातम्यांमधून मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ही हा विषय उपस्थित करण्यात आला. त्यावेळी अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना यावर काम करण्याची सूचना केली होती. 

- Breaking : पुण्यातील आणखी एका तालुक्यात कोरोनाची एन्ट्री; पहिलाच रुग्ण अन् तोही पॉझिटिव्ह!

पुण्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने आॅनलाईन अर्ज व्हायरल केला होता. त्यात विद्यार्थ्याचे नाव, गाव, संपर्क क्रमांक, भोजन मिळते का ही माहिती भरण्याचे आवाहन केले होते. गेल्या पाच-सहा दिवसात २ हजार ३०० विद्यार्थ्यांची माहिती संकलीत झाली आहे. यात बहुतांश विद्यार्थी हे विदर्भ, मराठवाडा येथील आहेत. 

- 'इथं शहर कोरोनाविरुद्ध लढतंय अन् तुम्ही शहर सुशोभिकरणाची टेंडर काढताय' : खा. चव्हाण

संघटनेचे महेश बडे यांनी बुधवारी (ता.२९) पुणे विभागीय कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपयुक्त 
संजयसिंह चव्हाण यांच्याकडे ही यादी सादर केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवेदन आणि विद्यार्थ्यांची यादी सादर केली आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकर कार्यवाही करण्याची मागणी महेश बडे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information of 2300 students stranded in Pune has been submitted to the Divisional Commissioners Office