Namdev Jadhav: पुण्यात नामदेवराव जाधव यांना काळं फासलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं कृत्य

शरद पवारांवर टीका केल्यानं त्यांना ही गोष्ट
Namdeorao Jadhav
Namdeorao Jadhav
Updated on

पुणे : मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. (Ink through on Namdevrao Jadhav in Pune by NCP activist)

Namdeorao Jadhav
Supriya Sule on Damania: "त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची भुजबळांवर कुरघोडी

शरद पवार जिंदाबादच्या घोषणा

पुण्यात पत्रकार भवनजवळ पत्रकारांशी संवाद साधताना नामदेवराव जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी थेट जवळ येऊन जाधव यांच्या तोंडाला शाई फासली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकानं जाधवांभोवतीकडं केलं. पण तरीही कार्यकर्ते जाधव यांच्यावर धाऊन जात होते. यावेळी हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही दिल्या. (Latest Marathi News)

Namdeorao Jadhav
Supriya Sule on Damania: "त्यांना 48 तासांत..."; दमानियांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची भुजबळांवर कुरघोडी

कार्यकर्त्यांचा म्हणणं काय?

पवार साहेबांविरोधात ते वारंवार विधानं करत आहेत. आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल. हे कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. यापूर्वी हा व्यक्ती शरद पवारांच्या पाया पडायला यायचा, त्यांना पुस्तकं द्यायला यायचा. त्यामुळं शरद पवारांविरोधात या व्यक्तीनं वेडीवाकडं विधानं केलेली खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

Namdeorao Jadhav
Aditya Thackeray: "...तर माझ्या आजोबांना आनंद झाला असता"; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

जाधवांचा रोहित पवारांवर आरोप

या घटनेला रोहित पवार जबाबदार आहे. लोकशाहीत यांची अशी गुंडागर्दी चालणार नाही. विश्रामबाग वाडा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं नामदेवराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Namdeorao Jadhav
Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

परवानगी नाकाल्यानतंर काय म्हणाले जाधव?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासण्यापूर्वी भांडाकर प्राच्यविद्या इन्स्टिट्युट इथं नामदेवराव जाधव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्याविरोधात आंदोलन सुरु केल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव भांडकरनं व्याख्यानाला परवानगी नाकारली.

यावर बोलताना जाधव म्हणाले, "लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार आहे. कार्यक्रमाला परवानगी नाकारली तर आपण पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये राहतो का? असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांना विचारेन आणि भांडारकरला पण जाईल. मी परवानगीसाठी पत्र दिलं होतं, त्यामुळं मी पोलिसांना विचारेन की परवानगी का नाकारली? जर मी कागद घेऊन पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसंच बोललं पाहिजे, विचारांची लढाई आहे ही, विचारानेच लढली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com