ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे? वरकुटे बुद्रुक व करेवडीत निवडणुकीची रंगत वाढली

interesting Elections after Varkute Budruk and Karewadi gram panchayats became independent this year
interesting Elections after Varkute Budruk and Karewadi gram panchayats became independent this year

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक व करेवडी ही ग्रुप ग्रामपंचायत यंदा स्वतंत्र झाल्याने दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढली आहे. पहिल्या टप्प्यात वरकुटे बुद्रुक व दुसऱ्या टप्प्यात करेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे राहणार, गावात किती पॅनल होणार की ग्रामपंचायत बिनविरोध होणार याची पारा वर चर्चा रंगत आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील वरकुटे बुद्रुक हे महत्वाचे गाव असूनगावातच जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या सोनाई उद्योग समूहाचा गूळ भुकटी निर्मिती कारखाना तसेच एस. व्ही. ऍग्रो. ही सेंद्रिय खत निर्मिती करणारा प्रकल्प आहे. हे दोन मोठे प्रकल्प वगळता गावाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते विजय शिंदे यांचे हे गाव आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, व्यापार संकुल, शरद चंद्रजी पवार सभागृह, जिल्हामध्यवर्तीबँकेची शाखा त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत झाली. मात्र पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या ते सक्रिय नाहीत.शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश देवकर व अशोक शिंदे ही जोडी राजकारणात सक्रिय असून नागरिकांचे प्रश्न सोडवत असल्याने त्यांची प्रतिमा चांगली आहे. त्याचबरोबर विजयसिंह बालगुडे, किशोर मदने, माऊली जगदाळे, युवराज फाळके आदी किंगमेकर गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कामास लागले आहेत.

पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही

काही जणांच्या मतेनिवडणूक बिनविरोध व्हावी तर सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गट आपल्या ताकदीची चाचपणी करत आहेत. त्यामुळे गावातराजकीय  फिवर वाढला आहे. मात्र यामध्ये प्रविण माने गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण ते आगामी आमदारकीनिवडणूकीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे निवडणुकीचेराजकीय महत्व वाढले आहे. दरम्यान दोन्ही ग्रामपंचायती विभक्त झाल्यानंतर ही पहिलीच ऐतिहासिक निवडणूक असली तरी अद्याप मतदार यादी तसेच प्रभाग रचना घोषित झाली नसल्याने नागरिक मात्र निवडणूक प्रकियेबाबतअनभिज्ञ व संभ्रमात आहेत. मात्र गावातील युवापिढी राजकीय फड गाजवत असून परिसरातील हॉटेलला बरे दिवस आलेआहेत. निवडणुकीत गावातील अतिक्रमण, पिण्याचे पाणी, शेती व शेतीपूरक व्यवसायाचे सक्षमीकरण, दुर्लक्षित कोरीव दगडी शिल्प, बेरोजगारी आदी प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत.  

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com