

Administrative Chaos: Sudden Transfers Spark Internal Discord in Pune Municipal Corporation
Sakal
पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर महापालिका आयुक्तांनी कार्यकारी अभियंता पदावरच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदल्या केल्या. पण या निर्णयाने आता अधिकाऱ्यांमध्ये भांडणे लागली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कनिष्ठ अधिकारी बॉस म्हणून बसविण्यात आले आहेत. तर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच काही जणांच्या बदल्या केल्याने नाराजी पसरली आहे.