आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच : अजित पवार

International Airport in Purandar taluka Ajit Pawar
International Airport in Purandar taluka Ajit Pawar

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातच होईल. मात्र विमानतळाची नवीन जागा ही यापूर्वीच्या जागेजवळ असून, पूर्वीपेक्षा उपयुक्त आहे. याबाबत राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे शिफारस प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पुरंदर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी विमानतळाच्या जागेला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकी कोठे होणार याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. 

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल 

यासंदर्भात पवार म्हणाले, पुरंदर तालुक्यात यापूर्वी विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेच्या तुलनेत नवीन जागा ही उपयुक्त आहे. त्या ठिकाणी खाचखळगे कमी आहेत. बागायती क्षेत्र कमी आहे आणि विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी ही उपयुक्त आहे. त्यामुळे नवीन विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होईल.

 

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे

सध्या कोरोना लसीचे उत्पादन घेत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवसापूर्वी आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागली होती. तसा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com