esakal | अंगणवाडी सेविकेमुळे महिलेला सासरच्यांकडून परत मिळाले बाळ; जुन्नरमधील घटना

बोलून बातमी शोधा

baby

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्ह्यातील दक्षता समित्यांच्या सदस्यांशी ऑनलाइन संवाद साधला.

अंगणवाडी सेविकेमुळे महिलेला सासरच्यांकडून परत मिळाले बाळ; जुन्नरमधील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुन्नर तालुक्यातील एक छोटंसं खेडं गाव. या गावातील माहेरवाशीण असलेल्या महिलेचे सासरी भांडण झाले. या भांडणानंतर सासरच्यांनी त्या महिलेचे लहान बाळ सासरीच ठेऊन घेतले आणि तिची माहेराला पाठवणी केली. बाळामुळे ही महिला बैचेन झाली आणि त्यातूनच तिने ही घटना गावच्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीने जुन्नर तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा खेडेकर यांना सांगितली.

खेडेकर यांनी सुरक्षा आणि दक्षता समितीच्या माध्यमातून ते बाळ मातेला परत मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले आणि सासरच्यांकडून माहेरवाशीणिला तिचे बाळ परत मिळाले, हा अनुभव जागतिक महिला दिनी सोमवारी (ता.८) जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याशी संवाद साधताना खेडेकर यांनी सांगितला. या अनुभवासह विविध दक्षता समित्यांचे अनुभव पानसरे यांनी सोमवारी (ता.८) जाणून घेतले. या अनुभवातूनच झेडपीच्या दक्षता समित्या ग्रामीण भागातील महिलांसाठी आधार ठरू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेडिकलला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; यंदा पदवीच्या जागा वाढणार!​

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी जिल्ह्यातील दक्षता समित्यांच्या सदस्यांशी ऑनलाइन संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सुमारे १०० सदस्यांनी या संवादात सहभाग घेतला. ग्रामीण भागात दक्षता समित्यांचे काम करत असताना आलेले विविध अनुभवही या महिलांनी अध्यक्षांच्या कानावर घातले. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वासनिक, जिल्ह्यातील सुरक्षा व दक्षता समित्यांच्या प्रशिक्षक डॉ. कविता करीर, पर्यवेक्षक डॉ. रत्नप्रभा पोतदार आदी उपस्थित होते.

'सुई से डर नहीं लगता डॉक्टर'; लस घेताना हसणाऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल​

महिला सुरक्षा व दक्षता समित्या गाव पातळीवर चांगले काम करत आहेत. हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आपणाला कोणतीही अडचण आल्यास, त्वरित संपर्क साधा. त्या अडचणी त्वरित दूर केल्या जातील, असे आश्‍वासन अध्यक्षा पानसरे यांनी यावेळी उपस्थित समिती सदस्यांना दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)