Corona Effect : इंटरनेटची मागणी चौपटीने वाढली; पण कनेक्शन जोडणार कोण?

Internet
Internet

पिंपरी : कोरोना संसर्गामुळे कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडीओ कॉल, कॉन्फरन्स यामुळे डेटाची मागणी या आठवड्यात चौपटीने वाढली आहे. घरबसल्या माहिती देवाण-घेवाण होत असल्याने इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

तीन लाखांच्यावर आयटी कर्मचारी शहरात आहेत. त्यांना डेटाची गरज मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्या तुलनेत हवे तितके एमबीपीएस स्पीड भेटत नाही. त्यातही सोशल मीडिया वापरकर्ते ही अधिक वेळ ऑनलाईन आहेत. बऱ्याच आयटी कर्मचारी कंपन्यांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहेत. तसेच युवा वर्ग व नागरिक घरबसल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ऑनलाईन घेत असल्याने इंटरनेट मागणी अधिकच वाढली आहे. 

एकाच परिसरात जवळपास शेकडो वाय-फाय जोडण्या वाढल्या आहेत. ब्रॉडबँडला सर्वाधिक मागणी आहे. तरीही अधूनमधून नेटवर्क डाऊनचे प्रकार घडत आहेत. याचा जास्त परिणाम खासगी नेटवर्क व होम राऊटर्स वापरणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग मंदावत आहे. महत्वाच्या वेबसाईट ही उघडण्यास वेळ लागत आहे. 

शासकीय कर्मचारी, अधिकारी, दवाखाने देखील आदान-प्रदान करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यातुलनेत इंटरनेट पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही. नव्या जोडणीची मागणी वाढल्याने केबलचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवठा करणाऱ्याकडे तगादा वाढला आहे. 

संथगती इंटरनेटचा भुर्दंड 

आयटी कर्मचारी वेबऍक्स ऍप्लिकेशन मध्ये काम करत असल्याने ते सिस्को व सॉफ्टकॉन सारख्या ऍप्लिकेशनला सपोर्ट करत नाही. विदेशी कंपन्या सोबत ही दिलेल्या लिंकवर कॉन्फरन्स कॉल जोडला जात नाही. त्यामुळे आठ तासाच्या कामाला दहा तास लागत आहेत. केवळ कमी इंटरनेट स्पीडमुळे विदेशी कंपन्यांना रिपोर्ट वेळेवर जात नसल्याची खंत आयटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

इन्स्टॉलेशन शुल्कात काळाबाजार 

इंटरनेट मागणी वाढल्याने इन्स्टॉलेशन शुल्क मनमानी पद्धतीने घेतले जात आहे. इंटरनेट प्लॅनचे दर बदलता येत नसल्याने या शुल्कात काळाबाजार केला जात आहे. एक हजार ते दोन हजार रुपये उकळले जात आहेत.

इंटरनेट केबलसाठी मनुष्यबळ हवे. इतर जिल्ह्यातील मुले या व्यवसायात आहेत.ती गावी गेली आहेत.इंटरनेटची मागणी खूप वाढली आहे. आमचा ही नाईलाज आहे. जोखीम घेऊन काम करणे अशक्य आहे.
- सुभाष ठोंबरे, नेटवर्क, पुरवठादार, थेरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com