Corona Virus : जिल्ह्यात २० ठिकाणी तपासणी नाके सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून  ग्रामीण भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या तपासणी नाक्यावर तपासणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आजपासून (ता.९) ग्रामीण भागातील २० ठिकाणी तपासणी नाके सुरु करण्यात आले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सर्व  तपासणी नाक्यांवर प्रत्येकी एक अधिकारी आणि एक कर्मचारी अशा दोघांची, याप्रमाणे तीन शिफ्टसाठी मिळून प्रत्येक नाक्यासाठी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- सूर्याच्या UV Rays मुळे कोरोना बरा होतो ?  जाणून घ्या व्हायरल सत्य असत्य 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून  ग्रामीण भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या तपासणी नाक्यावर तपासणी केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 आणखी वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा

जिल्ह्यातील देहू, खेड शिवापूर, कदमवाकवस्ती, वडकी, वाघोली, नांदेड, कोंढवे-धावडे, हिंजवडी, ताम्हिणी, भूगाव व सुस, सोमाटणे, लोणावळा, चिंबळी, मोई, माळशेज, आळेफाटा, वेळू, सारोळा आणि शिरूर ग्रामीण येथे हे तपासणी नाके आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation knocks started at 20 places in the district