परदेशी गुणतवणूकीसाठी 'इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’

Investor Facilitation Cell for Foreign investment in pune
Investor Facilitation Cell for Foreign investment in pune

पुणे : वाहन उद्योगांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी) उद्योगांना आकर्षित करून परदेशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी पुणे महापालिका ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) स्थापन करणार आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष उद्योग उभारणीची प्रक्रिया करून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल, अशी आशा आहे.

पुण्यात परदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी नेमक्या कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, या अनुषंगाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) पदाधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हा ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) सुरू करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ‘एमसीसीआयए’च्या पदाधिकाऱ्यांनी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन बिडकर यांनी दिले. बीडकर यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबणे उपस्थितीत होते.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योगांच्या सोयीसाठी ‘किमान सरकार-कमाल कारभार’ या तत्त्वावर कक्ष सुरू केला जाईल. नवे उद्योग, त्याचे स्वरूप, त्यातील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती जाणून घेऊन सुविधा पुरविण्यात येतील. पुढील महिनाभरात कक्ष स्थापनेचा पहिला टप्पा पूर्ण करू.
- गणेश बिडकर, सभागृह नेते

एमसीसीआयए (सेनापती बापट रस्ता) :
पुण्यात परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल’ (आयएफसी) सुरू करण्याची मागणी एमसीसीआयएच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी सिद्धार्थ शिरोळे, गणेश बिडकर, सुधीर मेहता, प्रशांत गिरबणे

काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com