
दोनशे कोटींच्या व्हायरल पत्रावर कृष्णप्रकाश यांची प्रतिक्रिया; म्हणाले,...
पुणे : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्यावर 200 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर सध्या मुंबईचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली असून, व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचे म्हटले आहे. तसेच हे खोटे पत्र लिहणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार डोंगरे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. (IPS Krishna Prakash Reaction On Allegation)
हेही वाचा: ''गुणवत्तेच्या आधारावरच काँग्रेसमध्ये मिळणार तिकीट''
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे एक खोट तक्रारी पत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे (Ashok Dongare) यांच्या नावाने तयार करून ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या संदर्भात स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी खुलासा केला.
हेही वाचा: क्रिकेट खेळत नसलो तरी, गुगली टाकता येते; राऊतांची फटकेबाजी
तक्रारीत काय
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, "तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या विरोधात माझे नाव वापरून बनावट तक्रारी अर्ज तयार करण्याचा कट रचण्यात आला आहे. अशाप्रकारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या विरोधात कट रचून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करण्यात आली. अशा प्रकारच्या कटाला आळा घालण्यासाठी संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी."
सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर पत्र हे केवळ आणि केवळ आपली बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापूर्वीदेखील वारंवार केले गेले होते आणि ते असफल ठरलेले असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
Web Title: Ips Krishna Prakash Reaction On Viral Letter Of Alleging 200 Crore Corruption
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..