esakal | मुंबई-बंगळूर हायवेवर इर्टिगा कारची तिघांना जोरदार धडक
sakal

बोलून बातमी शोधा

sus accident

या अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस नाईक बाबासाहेब पावसकर हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना तातडीने रिक्षात घालून रुग्णालयात पाठवून दिले.

मुंबई-बंगळूर हायवेवर इर्टिगा कारची तिघांना जोरदार धडक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बालेवाडी (पुणे) : मुंबई-बंगळूर महामार्गावर सूस खिंडीजवळ एका इर्टिगा कारची धडक बसल्याने तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई- बंगळूर महामार्गावरील बाणेरजवळील सूस खिंड येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी संबंधित रस्ते कंपनीकडून वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील राजेश पानगोळे (वय 40, मूळ रा. बुलडाणा, सध्या रा. बाणेर) हे सुरक्षारक्षक आज (ता. 9) सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला आपले काम करत होते. त्यावेळी रमेश भारती (रा. राजस्थान) हे राजस्थानवरून कर्नाटककडे जात होते. त्यांच्या इर्टिगा कारची (क्र. आर.जे. 42-1008) पानगोळे यांना आणि समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (क्र. एम. एच. 12 इ. एफ. 6968) जोरदार धडक बसली. या अपघातात  दुचाकीवरील अक्षय गायकवाड व ज्ञानेश्वर जाधव (रा. भोसरी) हे दोघेही जखमी झाले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अपघातातील जखमी जाधव यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल, तर गायकवाड यांना शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, पानगोळे यांना सुरुवातीला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर नवले हॉस्पिटल येथे पाठवले. पण, तेथे आय.सी.यू. व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सध्या त्यांची परिस्थिती नाजूक असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक ज्योती मुनमुले यांनी दिली. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

या अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस नाईक बाबासाहेब पावसकर हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना तातडीने रिक्षात घालून रुग्णालयात पाठवून दिले. तसेच, आपल्या सहकाऱ्यांसोबत अपघातातील दोन्ही वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. संबंधित कार चालकास हिंजवडी वाहतूक पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या अपघाताचा पुढील तपास हिंजवडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कविता रुपनर व पोलिस हवालदार दीपक परकाळे हे करत आहेत.