प्रशासनाचा मुक्‍या जनावरांच्या मृत्यूबाबतही मुकेपणाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुक्‍या जनावरांना इजा होणार नाही, याबाबत वाहनचालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघातात प्राण्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्‍या जनावरांचा रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत असतात. मात्र, या अपघातांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नाही की वाहनचालकांवरही कारवाई नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा मुक्‍या प्राण्यांच्या मृत्यूबाबतही प्रशासनाचा मुकेपणा दिसून येतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाहन अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गुन्हा दाखल करून संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, एखाद्या मुक्‍या जनावराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशाप्रकारे एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यासही कायद्यांतर्गत कारवाईची तरतूद आहे. मात्र, तरीही तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. वाहनचालक मोकाट सुटतात. महापालिका अथवा ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी त्या मृत जनावरांची विल्हेवाट लावतात. त्यामुळे अपघातात मृत होणाऱ्या जनावरांची नेमकी आकडेवारी संबंधित विभागाकडे उपलब्ध नाही. पशुवैद्यकीय विभागाकडे मृत्यू झालेल्या मोठ्या जनावरांची आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र कुत्रा, मांजर अशाप्रकारच्या छोट्या भटक्‍या जनावरांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.

पुण्यातील 'या' दोन मेट्रो मार्गांचे काम मार्चअखेरपर्यंत होणार

...घडलेला प्रसंग
दोन दिवसांपूर्वी निगडीतील एका रस्त्यावर भटक्‍या कुत्र्यांचे टोळके खेळत असताना त्यातील एक पिल्लू टेम्पोच्या चाकाखाली सापडले. यात त्या पिलाचा मृत्यू झाला. मात्र, याकडे किंचितही लक्ष न देता टेम्पोचालक निघून गेला. काही वेळाने महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आले व कुत्र्याच्या मृत पिलाला घेऊन गेले. त्याबाबत कोणतीही नोंद झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of administration is the issue of animal deaths