कॉर्पोरेट्सच्या फायनान्शिअल स्टॅबिलिटीसाठी लागणार तब्बल 'एवढा' कालावधी

It will take 17 months for thIt will take 17 months for the financial stability of corporatese financial stability of corporates
It will take 17 months for thIt will take 17 months for the financial stability of corporatese financial stability of corporates

पुणे : कोरोनाचे संकट, जागतिक मंदी, आर्थिक प्रगतीची धूसर शक्यता आणि सामाजिक अशांततेमुळे निर्माण झालेल्या स्थितीत कॉर्पोरेट्स आर्थिक गर्तेत सापडले आहे. त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी किमान 17 महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे टीआरए रिसर्च या 'कन्झ्युमर इन्साइट व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनी'ने केलेल्या सर्वेक्षणातुन पुढे आले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कन्झ्युमर इन्साइटविषयीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर टीआरएने नुकताच दुसरा अहवाल प्रकाशित केला आहे. "टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स 2020" नावाचा हा अहवाल आहे. 
 

टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी अहवालातील निष्कर्षांविषयी सांगितले, “जागतिक मंदी ही भारतीय कॉर्पोरेटपुढील सर्वात मोठी चिंता असून, काळजी घेणाच्या निर्देशकांवर जागतिक मंदी 66 टक्के आहे. त्यानंतर चिंतेचा विषय आरोग्याच्या बाबतीत निर्माण झालेल्या संकटावर मात करणे हे आहे. त्याचे प्रमाण 59 टक्के आहे. व्यवसाय टिकाव धरू शकणे, भारतातील आर्थिक स्थितीच्या वाटचालीचा निराशाजनक अंदाज व सामाजिक अशांतता हे तीन घटक 57 टक्के आहे. सध्या देशातील कॉर्पोरेटसमोर असलेली अनेक आव्हाने दर्शवत आहेत. ग्राहकांचा ढासळलेला आत्मविश्वास हा सर्वात खाली, म्हणजे 39% आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बाबतीत असलेली चिंता काहीशी कमी आहे. कॉर्पोरेट सध्या अडथळे ठरणाऱ्या मोठ्या घटकांचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते.”

दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी

वरिष्ठ व्यवस्थापनाला सामना कराव्या लागणाऱ्या बाबतींत बाजारातील तफावत हा घटक सर्वाधिक म्हणजे 32% असल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. या सर्व गोष्टींची सांगड घालण्याचे आव्हान वरिष्ठ व्यवस्थापनासमोर आहे. 

“कोविडमुळे झालेला परिणाम विचारात घेता, परिणामांच्या निर्देशाकांमध्ये सर्वात वरच्या स्थानी या वर्षाचे उत्पन्न 75 टक्के होते. त्यानंतर 64 टक्के परिणाम झालेल्या जाहिरातींचा नंबर होता. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मागणी किरकोळ असल्याने तातडीने नियंणात आणता येतील, अशा खर्चांमध्ये कपात केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट होते”
- एन. चंद्रमौली, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी

कॉर्पोरेटसमोरील प्राधान्यक्रम

- 69.5 टक्के प्राधान्य असणारी देखभाल कपात सर्वात वरच्या स्थानी
- दुसऱ्या क्रमांकावर, 65.5% प्राधान्य असणारी कपात ही भांडवली खर्चावर 
- बिझनेस स्ट्रॅटेजीसाठी (व्यवसाय धोरण) 64.5 टक्के कपातीचे प्राधान्य 
- कंपनी ऑपरेशन्सना 56.5 टक्के प्राधान्य 
- मनुष्यबळासाठीच्या खर्चामध्ये कपात करणे, यास सर्वात शेवटचे म्हणजे 51.5 टक्के प्राधान्य


अक्षय बोऱ्हाडे यांचा प्रवास : सायबर कॅफेतील कामगार ते सामाजिक कार्यकर्ता
"टीआरएज कोरोनाव्हायरस कॉर्पोरेट इनसाइट्स 2020" सर्वेक्षणाबाबत

- हा अहवाल 8 एप्रिल ते 4 मे कालावधीत तयार करण्यात आला
- यामध्ये 16 शहरांतील 101 कॉर्पोरेट कंपनींची मदत घेण्यात आली
- अहवालाच्या निष्कर्ष प्रमाणे आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरासरी 66.1 आठवडे (16.5 महिने) लागतील
- तसेच संपूर्ण क्षेत्र सुरळित होण्यासाठी 15 आठवडे (3.8 महिने) लागतील असे सर्वेक्षणामध्ये आढळले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com