esakal | क्षमापना तप महोत्सवा ने पर्युषण पर्व साजरे
sakal

बोलून बातमी शोधा

jain festival

क्षमापना तप महोत्सवा ने पर्युषण पर्व साजरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी : जैन धर्मियांचा अष्ट दिवसीय पवित्र उत्सव पर्युषण पर्व बिबवेवाडी येथे क्षमापना तप महोत्सवाने साजरा करण्यात आला. श्रमण संघाचे उपप्रर्वतक, नवकार साधक श्री तारकऋषि महाराज, श्री सुयोगऋषि आदि संतवृंद यांच्या पावन सानिध्या मध्ये रसिकलाल एम धारीवाल स्थानक भवन, जैन श्रावक संघ, बिबवेवाडी येथे तप, जप, धर्म आराधना आणी विवीध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बिबवेवाडी जैन संघा तर्फे आयोजित आठ दिवसीय महोत्सवात प्रभु महावीर वाणी च्या पवित्र अंतकृत दशांग सुत्र चे प्रतिदिन वांचन आणी विवेचन केले. दुपारच्या सत्रात कल्पसूत्र चे वांचन केले. आठ दिवस प्रतिदिन सत्य साधना महिला मंडळ आणी बहुश्रुत मंडळाने ने अनेक सांस्कृतिक उपक्रम सादर केले रोज सूर्यास्ताच्या वेळी प्रतिक्रमण ची आराधना करण्यात आली. पुर्णीमा डांगी यांनी 51 उपवास ची तपश्चर्या केली. तसेच अनेक बंधु भगिनींनी अकरा, आठ उपवास तसेच तेला, बेला, आयंबिल, एकाशन इ. तपश्चर्या केल्या. सकल समाजाला समाविष्ट करून घेण्यासाठी सर्व उपक्रमांचे ऑनलाईन प्रसारण करण्यात आले. लाखों भाविकांनी घरी बसुन लाभ घेतला. अष्ट दिवसीय महोत्सवात या प्रसंगी प्रतिदिन 12 तासांचे नवकार महामंत्र जाप चे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा: अनधिकृत फलकांवर पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई

यावेळी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, विजयकांत कोठारी, विजय भंडारी, बाळासाहेब ओस्तवाल, अभय छाजेड, लखिचंद खिवंसरा, ललित जैन आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. संघाच्या चेअरमन शोभा धारिवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रत्येकाने एक गरजु परिवाराला मदत करण्याचे तसेच वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी संघा तर्फे शाल, प्रशिस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देवुन तपस्वी बांधवांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन माणीक दुगड यांनी केले.

रमेशलाल गुगळे,पन्नालाल पितळीया, गणेश ओसवाल, प्रविण चोरबेले, लालचंद कर्नावट, सुभाष बाफना, अविनाश कोठारी, प्रकाश गांधी,संपतशेठ भटेवरा, किर्तीराज दुगड,बाळासाहेब कर्नावट, विजय समदाडिया, चंपालाल नहार, संजय श्रीश्रीमाळ , चंद्रकांत सुराणा, रमणलाल लुंकड, चंद्रकांत लुंकड, रामलाल संचेती, सुनिल बलाई, तसेच महिला मंडल अध्यक्ष सविता कर्नावट, मंगल खिवंसरा, मिना काग, शितल गांधी, मंगल लुंकड आदी उपस्थित होते.

loading image
go to top