CoronaVirus : जनता कर्फ्युला पुण्यातील हडपसरमध्ये प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

जनता कर्फ्यु असल्याने पहाटेपासूनच कोणी घराबाहेर निघत नसल्याचे पाहण्यास मिळाले. अन्यथा पहाटेची वेळ असल्याने शुध्द हवेत फिरणाऱ्यांनी रस्ते भरलेले असतात. आज हे चित्र पाहण्यास मिळाले नाही. पीएमपी बस तुरळक प्रमाणात सुरू होत्या. मात्र त्यात प्रवाशी नसल्याचे चित्र पहायला मिळाले. 

हडपसर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला हडपसरमधील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. लॅाकडाउन केल्याचे दृष्य रविवारी सर्वत्र हडपसरमध्ये पहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा, दुकाने, कार्यालये आणि बाजारपेठा आज पूर्णपणे बंद होत्या.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी येथील मुख्य बाजारपेठांचा भाग असलेली पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडई, कामधेनू इस्टेट, ससाणेनगर रस्ता, गाडीतळ हे भाग पूर्ण बंद होते. रस्त्यांवर पोलिसांच्या गाडया फिरताना दिसत होत्या. तर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दीकील पोलिसही तैनात होते. रस्त्याने जाणऱ्या एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती. 

Coronavirus : राज्यात वाढतीये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या; एकट्या पुण्यात...

जनता कर्फ्यु असल्याने पहाटेपासूनच कोणी घराबाहेर निघत नसल्याचे पाहण्यास मिळाले. अन्यथा पहाटेची वेळ असल्याने शुध्द हवेत फिरणाऱ्यांनी रस्ते भरलेले असतात. आज हे चित्र पाहण्यास मिळाले नाही. पीएमपी बस तुरळक प्रमाणात सुरू होत्या. मात्र त्यात प्रवाशी नसल्याचे चित्र पहायला मिळाले. 

देशात 'जनता कर्फ्यू'; पण पुणे जिल्ह्यात...
 

हातावरचे पोट असणारा वर्ग देखील घरातच थांबून होता. गल्लीबोळातील महिलांचा रोजचा कलकलाटही एैकायला मिळाला नाही. लहान मुले यांना घराबाहेर पडण्यास पालकांनी मज्जाव केल्याने तीसुध्दा घरात टि. व्ही. समोर बसली होती. दुकानांचे शटरडाऊन, घराचे दरवाजे बंद तर रस्ते सामसूम असे चित्र प्रथमच पहायला मिळाले. एखाद-दुसरे वाहन रस्त्यावर दिसल्यावर पोलिसांकडून वाहनधारकांची चांगलीच हजेरी घेतली जात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Curfew got Response at hadpsar area in pune