कांद्याचे भाव खाली आणण्यासाठी जपानी कल्पनेचा विचार? सविनय कांदा सत्याग्रह चळवळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

कांद्याचे वाढते भाव आणि त्याबद्दल येणा-या विविध प्रतिक्रीया याने समाज माध्यमांची जागा या महिन्यात मोठ्या प्रमाणावर व्यापली. कांद्याने वांदा केला राव, कांदा कापला की डोळ्यात पाणी यायचे आता किंमत ऐकली तरी डोळे पाणवतात, आमच्याकडे खास बनवलेले कांद्याचे दागिणे मिळतील- कांदे ज्वेलर्स.. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटत असतानाच आता सविनय कांदा सत्याग्रहाची चळवळ सोशल माध्यमावर आकारास येत आहे.

पौडरस्ता (पुणे) : कांद्याचे वाढते भाव आणि त्याबद्दल येणा-या विविध प्रतिक्रीया याने समाज माध्यमांची जागा या महिन्यात मोठ्या प्रमाणावर व्यापली. कांद्याने वांदा केला राव, कांदा कापला की डोळ्यात पाणी यायचे आता किंमत ऐकली तरी डोळे पाणवतात, आमच्याकडे खास बनवलेले कांद्याचे दागिणे मिळतील-कांदे ज्वेलर्स.. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटत असतानाच आता सविनय कांदा सत्याग्रहाची चळवळ सोशल माध्यमावर आकारास येत आहे.

नो ओनियन मंथ (कांदे विरहीत महिना) या नावाने एक पोस्ट सध्या व्हॉटसअपवर फिरत आहे. त्यामध्ये जपानमधील नागरिक अनावश्यक किंमत वाढीला संघटीतरित्या कसे तोंड देतात, किंमती कशा पध्दतीने खाली आणतात याचा उल्लेख केला आहे. आपण जर पंधरा दिवस कांदा वापरणे बंद केले तर आपोआप कांद्याच्या किंमती खाली येतील असा तर्क यामध्ये मांडण्यात आला आहे. जर ग्राहकांनी कांदा घेणे बंद केले तर कांद्याची अनावश्यक साठवणूक करणारांना त्याचा फटका बसेल. मागणी आणि पुरवठा या तत्वाचा आधार येथे घेतला आहे.

अजित पवारच आमच्याकडे आले होते; सत्तानाट्यानंतर फडणवीसांची पहिली मुलाखत

अभिजीत परांजपे (आयडीयल कॉलनी)- ग्राहकाने जर चातुर्मासा प्रमाणे व्रत करत एक महिनाभर कांदा खाल्ला नाही तर ज्यांनी साठवणूक केली आहे. त्यांना तो विक्रीसाठी बाहेर काढावा लागेल. सध्याच्या किंमत वाढीचा फायदा शेतक-याला नाही पण साठवणूक करणारालाच होत असल्याचे दिसते. दलाल/ व्यापारी तुपाशी आणि शेतकरी, ग्राहक उपाशी असे दिसते. त्यामुळे जनतेने अशी काही भूमिका घ्यायला हवी.

खडसेंची नाराजी नेमकी कुणावर? फडणवीस की महाजन?

लक्ष्मण चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते)- पेट्रोलच्या किंमती वाढल्यातर लोक आंदोलन करत नाहीत पण कांद्याचे दर वाढले तर लोक नाक मुरडू लागले आहेत. एखाद्या सिझनमध्ये शेतक-याला दर जास्त मिळाला तर एवढे काय नुकसान होणार आहे. महिनाभर दुचाकी  वापरणार नाही असे आंदोलन घेवून बघा. मी कांदा खात नाही त्यामुळे मला फरक पडत नाही असे मंत्र्याने म्हणणे म्हणजे प्रश्नापासून दूर पळणे आहे.

भाजलेल्या नातीचा मृत्यू; आजी-आजोबा गंभीर

सीताराम बाजारे (शेतकरी कार्यकर्ते)- काय खावे, खावू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ठेवावा. शेतक-यांची जीरवा हा सुप्त विचार यामागे आहे. पंधरा दिवस शेतक-यांनी कोणताही माल पाठवायचा नाही असा निर्णय घेतला तर काय होईल याचा विचार करावा.

रवी कंद (शेतकरी)- आम्ही शेतकरी आषाढ- श्रावणातच कांदा विकून टाकतो. अवघे दोन-तीन टक्के कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवू शकतात. बाजारात जास्त किंमतीने विकला जात असलेला कांदा हा शेतक-याने साठवलेला नाही. याचा फायदा हा व्यापारी दलालांनाच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese idea to bring down onion prices in maharashtra