जयंत पाटील यांनी जाणून घेतली 'चाणक्य नीती'

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 28 डिसेंबर 2019

वारजे माळवाडी (पुणे) : राज्यात उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दोन दिवस अगोदर राज्याचे अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना शनिवारी 'चाणक्यनीती' आणि 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचण्याचा मोह आवरला नाही. 

अंगावर शहारा आणणारी घटना; शहा येथे अंगणवाडीची भिंत कोसळली
 
त्याचे झाले असे की, कोथरूड येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुस्तके पाहताना त्यांना वा.ल.मंजुळ यांचे 'चाणक्यनीती' पुस्तके दिसले. त्यांनी ते लगेचच हातात घेतले आणि आवर्जून त्यांनी काही पाने चाळली. त्यानंतर वि. ग. कानिटकर लिखित 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तकही त्यांनी हातात घेऊन चाळले. त्यामुळे, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळा विस्ताराच्या दोन दिवसांपूर्वी एवढा वेळ दिल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती. 

पुणे-सातारा महामार्गाने फिरायला जाताय? मग ही बातमी हमखास वाचाच...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil Read the book of Chanakya Neeti and Nazi Bhasmasuracha Udayast in pune