esakal | जयंतराव हे प्रति लोकमान्य टिळक भासायचे; ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले
sakal

बोलून बातमी शोधा

जयंतराव हे  प्रति लोकमान्य टिळक भासायचे; ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले

जयंतराव हे प्रति लोकमान्य टिळक भासायचे; ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जयंतराव टिळक हे सातत्याने संपादकांच्या शब्दाला महत्त्व द्यायचे. त्यांनी संपादकांना नेहमी आकार देण्याचे काम केले, असे मत ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी मंगळवारी (ता.१२) येथे व्यक्त केले.

हेही वाचा: लहान मुलांसाठी 'कोव्हॅक्सिन'ला अद्याप परवानगी नाही; आरोग्य राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

पुणे पत्रकार प्रतिष्ठानने दिवंगत जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या समारंभाला केसरीचे विश्वस्त - संपादक डॉ. दीपक टिळक, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, कार्यवाह गजेंद्र बडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर व सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

गोखले म्हणाले, " जयंतराव टिळक यांनी पुणे शहरात अनेक संस्था वाढवल्या. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहर घडवण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांची मुलूखमैदानी तोफ अनुभवताना ते प्रति टिळक भासायचे. ते माणुसकी जपणारे वादळ होते. त्यांनी माणुसकीचा पोत हरवू दिला नाही."

लोकमान्य टिळकांचा वारसा जपण्याचे अवघड कार्य जयंतराव टिळकांनी केले. त्यांना टिळक वाडा सोडावा लागला आणि अकरा वर्षे आश्रितासारखे राहावे लागले तरी त्यांच्या मनात कोणाबद्दल राग नव्हता. पुण्यातील अनेक संस्थाने खालसा झाली, पण जयंतराव हे संस्थान उभे राहिले. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती जोपासून लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरणात आणला, असे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.

हेही वाचा: "...म्हणून कोळसा टंचाई निर्माण झाली"; केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण

"सामान्यांना केंद्रबिंदू मानून लिहिण्याचे संस्कार"

भाषाशैली आणि भाषेतील प्रखरपणा कमी होऊ न देता संपादकाने संपादकाच्या भाषेत कसे लिहिले पाहिजे आणि पत्रकारांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कसे लिहावे, याचे संस्कार जयंतराव टिळकांनी केले. जयंतरावांमुळे आम्ही लिहिते झालो, अशी भावना अरविंद गोखले यांनी यावेळी व्यक्त केली.

loading image
go to top