जयेश कासटच्या कोठडीत वाढ; अडसूळचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पुणे : खंडणी प्रकरणात अटक केलेल्या पोलिस मित्र जयेश भगवानदास कासट याच्याकडून पोलिसांनी पाच लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 21 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली. दरम्यान, याच प्रकरणातील मनोज अडसूळ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून गुरूवारी सुनावणी होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : खंडणी प्रकरणात अटक केलेल्या पोलिस मित्र जयेश भगवानदास कासट याच्याकडून पोलिसांनी पाच लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 21 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली. दरम्यान, याच प्रकरणातील मनोज अडसूळ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून गुरूवारी सुनावणी होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. हेमंत तुकाराम अडसूळ (वय 55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ मनोज अडसूळने डॉ. दीपक रासने यांच्याकडून 75 लाख रूपये घेतले होते. त्याबाबतची माहिती कासटला मिळाल्यानंतर त्याने अडसूळ याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून धमकी दिली. त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळले होते. तसेच उर्वरित पैशांसाठी तगादा लावला होता. कासटला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी त्यास 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

दरम्यान, विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून डॉक्‍टरकडून 75 लाखांची खंडणी उकळणाऱ्या अडसूळ याच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत मंगळवारी सुनावणी झाली. त्याच्या अटकपूर्व जामिनाला सरकारी पक्षाने विरोध केला. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात गुरूवारी (ता.20) पुढील सुनावणी होणार आहे. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने यांच्या मुलाला ऍट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून अडसूळने डॉ. रासने यांच्याकडून 75 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर तो 55 लाख रुपये त्यांच्याकडे मागत होता. याप्रकरणी अडसूळ याने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अडसूळला खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. त्यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. या प्रकरणाचा सखोल तपासासाठी आडसूळला अटक करणे गरजेचे आहे, असा युक्‍तीवाद ऍड. पाठक यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayesh Kasa increase custody and adsuls Bail application rejected

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: