esakal | नाटककार एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh elkunchwar

अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे. अमेरिका स्थित मराठी माणसांनी स्थापन केलेल्या या फाउंडेशनच्या वतीने साहित्यातील पाच, समाजकार्यातील पाच आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार असे एकूण 11 पुरस्कार दिले जाणार आहे.

नाटककार एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य आणि समाजकार्यातील पुरस्कारांची घोषणा 
पुणे - अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे. अमेरिका स्थित मराठी माणसांनी स्थापन केलेल्या या फाउंडेशनच्या वतीने साहित्यातील पाच, समाजकार्यातील पाच आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार असे एकूण 11 पुरस्कार दिले जाणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या पुरस्कारांचा वितरण समारंभ या वर्षी होणार नसून, त्या ऐवजी ऑनलाइन वितरणासंबंधी विचार-विनिमय चालू असल्याचे फाउंडेशनने कळविले आहे. गेली 27 वर्ष हे पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. यावर्षीचे आयोजन महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) आणि साधना ट्रस्टच्या वतीने यांच्या वतीने करण्यात येत आहे. पुरस्काराच्या निवडीसाठी भारत आणि अमेरिकेत स्वतंत्र समित्या असतात. भारतातील समितीकडून तीन नावांची शिफारस केली जाते आणि अमेरिकेतील निवड समिती त्यातील एक नाव निश्‍चित करते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

के. वीरमणी यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार -
तमिळनाडूत विवेकवादाची चळवळीचे शिलेदार डॉ. के. वीरमणी यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पेरियार रामास्वामी यांच्या सोबत आणि नंतरही द्रविड चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. वयाच्या दहाव्या वर्षापासून गेली सात दशके ते सामाजिक कार्यात सहभागी असून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभाग देत आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना कात्रज डेअरीकडून नववर्षाचं गिफ्ट; दूधाच्या खरेदी दरात करणार वाढ!

पुरस्कारार्थी 
साहित्यातील 

1) महेश एलकुंचवार (नागपूर) - दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार 
2) सुबोध जावडेकर (मुंबई) - वाङमयप्रकार पुरस्कार - विज्ञानकथा 
3) किरण येले (मुंबई) - ललित ग्रंथ पुरस्कार - "तिसरा डोळा' कथासंग्रह 
4) प्रदीप पुरंदरे (पुणे) - वैचारिक अपारंपरिक किंवा ग्रंथ पुरस्कार - "पाण्याशप्पथ' ग्रंथ 
5) श्‍याम पेठकर (नागपूर) - रा.शं. दातार नाट्य पुरस्कार - "तेरवं' नाटक

अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; राज्य सरकारने काढला आदेश! 

समाजकार्यातील 
1) गजानन खांतू (वाशी, मुंबई) - जीवनगौरव 
2) जतीन देसाई (मुंबई) - विशेष कृतज्ञता पुरस्कार 
3) अरुणा सबाने (नागपूर) - कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार 
4) सुधीर अनवले (उदगीर) - कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार 
5) चेतन साळवे (धडगाव, नंदुरबार) युवा पुरस्कार

Edited By - Prashant Patil

loading image