esakal | शेतकऱ्यांना कात्रज डेअरीकडून नववर्षाचं गिफ्ट; दूधाच्या खरेदी दरात करणार वाढ!
sakal

बोलून बातमी शोधा

Katraj_Milk

गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये संघाची मिठाई, मोदक, पेढे, श्रीखंड आणि आम्रखंड हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून त्यांचा खप वाढला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शेतकऱ्यांना कात्रज डेअरीकडून नववर्षाचं गिफ्ट; दूधाच्या खरेदी दरात करणार वाढ!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज (पुणे) : कात्रजच्या दूध खरेदी दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. येत्या १ जानेवारीपासून गायीच्या दूधासाठी १ रुपया, तर म्हशीच्या दूधासाठी २ रुपये खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेत हा निर्णय घेण्यात आला. 

ऑनलाईनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सभेत २०१९-२० या वर्षाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्यात आला. सभेच्या सुरुवातीस संघाचे चेअरमन विष्णू ध. हिंगे यांनी संघाचे 2019-20 या आर्थिक वर्षातील संघाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःत बदल घडविणे आवश्‍यक : डॉ. रस्तगी

हिंगे म्हणाले, 'संघास १९-२० या आर्थिक वर्षात २ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लि. १ रुपयाप्रमाणे एकूण सुमारे ६.९४ कोटी रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार असून प्रति लिटर ५० पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलेली आहे'. उर्वरीत रक्कम मार्च २०२१ पूर्वी देण्यात येणार असल्याचे हिंगे यांनी सांगितले. सभेत कैलास तांबडे, मनिष मोरडे. लक्ष्मणराव मुके, अजित पवार, नाना वरे, किरण मांजरे, किशोर तांबे आदी संस्था प्रतिनिधींनी मते मांडली.

विज्ञानप्रेमींसाठी सुवर्णसंधी! जगातल्या सर्वांत मोठ्या व्हर्चुअल विज्ञान महोत्सवात सहभागी व्हा!

गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये संघाची मिठाई, मोदक, पेढे, श्रीखंड आणि आम्रखंड हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून त्यांचा खप वाढला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गत अर्थिक वर्षात दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणेसाठी संघामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. संघाने एफएसएआय यांचे सोबत फोसटॅक (फूड सेफ्टी ट्रेनिंग अ‍ॅण्ड सर्टिफिकेशन) ट्रेनिंग पार्टनरशिप घेतली. कोंढापुरी येथे पशुखाद्य कारखाना उभारण्याचे कामकाज पुर्णत्वास आणले. स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहण्यासाठी संघामध्ये उत्पादन विभागामध्ये आधुनिकीकरण करण्यात आले, अशा प्रकारची काही कामे केली असल्याची माहितीही सभेत देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top