जिजामाता पतसंस्थेच्या उपाध्यक्षाचा राजीनामा

जिजामाता पतसंस्थेच्या उपाध्यक्षाचा राजीनामा
Published on

जिजामाता पतसंस्थेच्या उपाध्यक्षाचा राजीनामा
मंगळवेढा : संस्थेच्या कामकाजात अनियमितता होत असल्याचा आरोप करत जिजामाता महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा रंजना जगदाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत योग्य माहिती दिली जात नसल्याने तसेच कर्जवाटप प्रक्रियेत नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे. २७ फेब्रुवारी २०२६ नंतर झालेल्या कोणत्याही बैठकीत आपण सहभागी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याची प्रत संस्थेसह जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे देण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख पतसंस्थेतील या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com