कमी केलेल्या अभ्यासक्रमाबाबत शिक्षक, विद्यार्थी संभ्रमात; केली 'ही' मागणी

मीनाक्षी गुरव
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिले ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून कमी केलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र, आता कमी केलेल्या पाठाचा सविस्तर अभ्यास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करू लागलेत. त्याबाबत काही शिक्षकांनी आपली मते मांडली आहेत.

पुणे : ''अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासाबाबत संभ्रम असून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे'', अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिले ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून कमी केलेल्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र, आता कमी केलेल्या पाठाचा सविस्तर अभ्यास कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक करू लागलेत. त्याबाबत काही शिक्षकांनी आपली मते मांडली आहेत.

इयत्ता अकरावी आणि बारावीच्या भूगोल विषयाचा २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात 100 टक्के गोंधळ, संभ्रम आणि अस्पष्टपणा आहे. नेमक काय आणि कोणता घटक मुळ अभ्यासक्रमातून कमी केला आहे काहीच लक्षात येत नाही. कमी केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात राज्यमंडळाने अधिक सविस्तर आणि आकलनसुलभपणे खुलासा करणे आवश्यक वाटते, मत नूतन मराठी कनिष्ठ विद्यालयाच्या (मुलांचे) भूगोल विषय शिक्षक राजेंद्र निकत यांनी मांडले.

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार

अर्थशास्राचे शिक्षक उषा जांभळे आणि विक्रम चिगरे म्हणाले, "कमी केलेला अभ्यासक्रम अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवला आहे. त्यामुळे तो नक्की कसा घायचा, याबाबत कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही. तसेच अप्रत्यक्षपणे हा कमी केलेला बरासा अभ्यासक्रम घ्यावा लागणार आहे. स्वयंअध्ययनासाठी दिलेल्या संकल्पनाबाबत संभ्रम आहे. प्रत्येक टॉपिक मधील थोडा-थोडा भाग कमी करण्यापेक्षा शेवटचे दोन किंवा तीन पाठ कमी केले असते तर अध्यापन करणे अजून सोयीस्कर झाले असते.

बारावी वाणिज्य शाखेत गणित विषय शिकविणाऱ्या शुभदा जोशी म्हणाल्या,"कमी केलेला अभ्यासक्रम स्वयं अध्ययन करण्यास सांगितले आहे. वाणिज्य शाखेत गणितामध्ये सोडविण्याची खूप गणिते स्वयं अध्ययनकरिता ठेवली आहेत. त्यामुळे खूप गोंधळ, अस्पष्टता आहे. नीट मार्गदर्शन व्हायला हवे."

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 

अभ्यासक्रम कमी केला आहे, तरी काही पाठ स्वयं अध्ययनासाठी ठेवल्याने विद्यार्थ्यांना नक्की फायदा होणार आहे, प्रॅक्टिकल पण काही प्रमाणात कमी केले आहेत. शासनाचा हा निर्णय अगदी योग्य असून त्यामुळे विद्यार्थावरील अभ्यासाचा काही प्रमाणात कमी होणार असला तरी बारावीनंतर असलेल्या जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांचे नुकसान होणार असल्याचे काही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे म्हणणे आहे. 
 

सायकल, कार नव्हे तर, आता जनावरांची खरेदी-विक्रीही ऑनलाईन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior college teachers and students are confused about reduced curriculum