कनिष्ठ महाविद्यालयांनो, लवकरात लवकर नोंदणी करा; केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे निर्देश!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

अनेक महाविद्यालये अगदी शेवटच्या दिवशी नोंदणी करत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. परिणामी नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सर्वर डाऊन होण्याची परिस्थिती ओढावते.

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील जवळपास २११ कनिष्ठ महाविद्यालयांनी आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. त्यातील १३३ महाविद्यालयांची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंजूर झालेली नाहीत. परंतु वैयक्तिकरित्या महाविद्यालयांच्या लॉगिनला, एसएमएसद्वारे त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्रुटींच्या पुर्ततेबाबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत, जेणेकरून संबंधित महाविद्यालये मंजूर होतील, असे अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Big Breaking : पुण्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाची कुठे झाली बदली!

अद्याप ९३ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली नसून त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयाला महाविद्यालयांना मंजूरीसाठी पुरेसा वेळ मिळतो. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने देऊ नयेत. तसेच महाविद्यालयांची नोंदणी प्राधान्याने करावी. संबंधित महाविद्यालयांनी लॉकडाऊनमुळे दिलेल्या ई-मेल आयडीवरच प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचनाही अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने दिल्या आहेत.

पुणेकरांची पुन्हा दारु खरेदीसाठी झुंबड; आज दिवसभरातील दारुचा खप तर पाहा!​

महाविद्यालयांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका 
"अनेक महाविद्यालये अगदी शेवटच्या दिवशी नोंदणी करत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. परिणामी नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सर्वर डाऊन होण्याची परिस्थिती ओढावते. त्यामुळे 
अकरावी केंद्रीय प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणीकरिता दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यत वाट न पाहता, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी," असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी केले आहे. 

तीन वर्षांनंतर झेडपीत बदल्यांचा मोसम होणार सुरू; प्रक्रियेतून 'यांना' वगळले!​

कनिष्ठ महाविद्यालयांची आकडेवारी :
- कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण संख्या : ३०४
- नोंदणी झालेली महाविद्यालये : २११
- अॅप्रुव्ह झालेली महाविद्यालये : ७७
- त्रुटींमुळे अॅप्रुव्ह न झालेली महाविद्यालये : १३३

अधिक माहितीसाठी :
- www.dydepune.com
- https://pune.11thadmission.org.in/

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior colleges should register as early as possible said Meena Shendkar