esakal | जुन्नरला आढळला मराठेशाहीतील पट
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती चित्रशैलीने पत्रिकेची सुरुवात

जुन्नरला आढळला मराठेशाहीतील पट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : गोळेगाव (ता. जुन्नर) येथील इतिहासाचे अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांना काही दिवसांपूर्वी जीर्ण झालेल्या स्वरूपात कागदी पट मिळाला आहे. त्यावर नव्याने प्रकाश टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: डाळज येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियम संदर्भात जनजागृती

यासंदर्भात ताम्हाणे म्हणाले, कागदी पत्रिका पटाची सुरुवात गणपती चित्रशैलीने झालेली असून वेगवेगळ्या नैसर्गिक रंगामध्ये काळ्या बाह्यरेषांनी गणपती चित्रशैली साकार केलेली दिसत आहे. ह्या चित्रशैलीवरील रंग-संगती, पोशाख हे मराठा शैलीतील असून त्यांची तुलना लेण्याद्री येथील लेणी क्रमांक सात मधील ‘सारीपाट’ खेळत असलेल्या गणपतीच्या मराठाकालीन भित्तिचित्राशी करता येईल. हा कागदी पत्रिका पट बारा सेंटिमीटर रुंद व वीस फूट लांब आहे.

हेही वाचा: 'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

जुन्नरमध्ये तयार झालेल्या जुंद्री हात कागदाच्या पट्ट्या एकमेकांना जोडून कागदाच्या गुंडाळ्यावर दोन्ही बाजूस उभ्या पट्ट्या आखून पत्रिकेच्या मजकुराची सुरूवात श्री गणेशाय नम: ने करण्यात आली आहे. पत्रिका पट जुन्नर मध्ये लिहल्याचा उल्लेख असून त्यात एक प्रख्यात सरदार घराण्यातील व्यक्तीची जन्म, लग्न कुंडली चक्रं तसेच जन्म, राशी कुंडली चक्रं त्याच बरोबर ग्रहराशीच्या प्रमाणबद्ध आकृत्या काढलेल्या आहेत. त्यात त्यांच्या घराण्यातील स्त्री-पुरूष व्यक्तीचा नावासह उल्लेख केलेला आढळतो.

या शिवाय कागदी पटावर मधूनच चक्रांच्या सुबक आकृत्या काढलेल्या आहेत. पत्रिका कुंडलीतील गणपतीचे चित्र, भौमितिक आकृत्या ही खास मराठा शैलीची ओळख असून त्यावर अभ्यास सुरू असल्याचे बापुजी ताम्हाणे यांनी सांगितले.

loading image
go to top