Junnar News : पिंपरी पेंढार येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ़ी ठार

सदर घटना पिंपरी पेंढारच्या कोंबडवाडी येथे शनिवारी(ता.६) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
junnar pimpri pendar leopard attack sheep killed animal forest department
junnar pimpri pendar leopard attack sheep killed animal forest departmentsakal

पिंपळवंडी : पिंपरी पेंढार(ता.जुन्नर) येथील अरुण आनंदा पोटे यांच्या गाईंच्या खुल्या गोठ्यामध्ये तारेच्या कुंपनाखालून बिबट्याने प्रवेश करून एक मेंढ़ी ठार केली. यावेळी दोन तास गाईंनी बिबट्याचा रस्ता अडवून ठेवला होता.

सदर घटना पिंपरी पेंढारच्या कोंबडवाडी येथे शनिवारी(ता.६) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.बिबट्याने गाईंच्या गोठ्यामध्ये प्रवेश केला त्यावेळी तेथे बांधलेली मेंढी बिबट्याने ठार केली.मेंढीच्या आवाजाने पोटे यांचा मुलगा व कामगार धावत त्याठिकाणी आले असता त्यांना समोरच बिबट्या दिसला.

सदर घटनेची माहिती पोटे यांनी वनविभागाचे बाबाजी खर्गे यांना कळविली.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला.गोठ्याच्या सर्व बाजुला तार कुंपन असल्याने तो बिबट ज्या ठिकाणी गाई आहेत तिकडे गेला.

पोटे यांच्या लहान मोठ्या ४५ गाई मोकळ्या असल्याने सर्व गाईंनी बिबट्याकडे मोर्चा वळविला. त्यावेळी तो बिबट गाईंना खाद्य देण्यासाठी असलेल्या गव्हाणींच्या खाली जाऊन लपला. बिबट पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला की सर्व गायी त्याच्या जवळ जात होत्या. जवळपास दीड ते दोन तास हे सुरू होते.

गाईंना गव्हाणी मध्ये खाद्य टाकल्यावर गाई एका बाजूला झाल्या त्यावेळी ओपन गोठ्याच्या मागील बाजूचा दरवाजा उघडला आणि दुसऱ्या बाजूने जाऊन बिबट्याला हुसकवले असता बिबट्याने तेथुन पळ काढला.

यामध्ये पोटे यांचे १६ हजार रुपयांचे नुकसान झाले असुन दोन तास सुरू असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संतोष साळुंखे,

बी.के. खर्गे त्याचप्रमाणे या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी जुन्नर रेस्क्यू टीमचे बाबाजी खर्गे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सदर ठिकाणी बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com