जुन्नरला पालिकेच्या गॅलरीमध्ये भटक्या कुत्र्याचा वावर

दत्ता म्हसकर
Tuesday, 27 October 2020

मोकाट जनावरांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. ही जनावरे रस्त्यावरच मलमूत्र विसर्जन करत असल्याने दुर्गंधी सुटते. रस्त्यावर तहान मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वृद्ध, महिला व मुले यांना पायी जाताना त्रास होतो.यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी शहरातील जनतेची मागणी आहे. 

जुन्नर(पुणे) : ''जुन्नर नगर पालिका भटकी कुत्री व मोकाट जनावरांच्या प्रश्नाची सोडवणूक कधी करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीत देखील भटक्या कुत्र्यांचा वावर होत असल्याचे नागरिकांना आढळून आले आहे.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''मोकाट जनावरांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. ही जनावरे रस्त्यावरच मलमूत्र विसर्जन करत असल्याने दुर्गंधी सुटते. रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. वृद्ध, महिला व मुले यांना पायी जाताना त्रास होतो. यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी शहरातील जनतेची मागणी आहे. ''

मोकाट जनावरे पकडणारा ठेकेदार उपलब्ध झाला, मात्र त्याला कामाचा आदेश दिला नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याला आदेश मिळताच तो कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार असला, तरी भटक्या कुत्र्यांच्या बाबत पालिकेकडून कोणती कारवाई केली जाणार हे स्पष्ट होत नाही, कारण आरोग्य विभागाकडे श्वान पकडण्यासाठी वाहन अथवा प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. यामुळे हे काम देखील ठेकेदारी पद्धतीने करून घेणे अपेक्षित आहे.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

शनिवारी (ता.२४) सुट्टीच्या दिवशी पालिकेच्या प्रवेशद्वाराचे शटर चक्क बंद असतानाही नगर पालिका इमारतीच्या गॅलरीमधे कुत्रे फिरताना दिसत होते. भररस्त्याने तसेच गल्ली- बोळात भटकी कुत्री टोळी टोळीने फिरत असताना दिसतात. असे मेहेर यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या संबधी लवकरात लवकर उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती मेहेर यांनी केली आहे.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junnar is a stray dog ​​in the municipal gallery