दुर्दैवी घटना! 'कुमशेतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू'; जुन्नर तालुक्यात हळहळ, आई घरात स्वयंपाक अन्..

While Mother Cooked Inside: सिद्धार्थचे आई वडील आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धावले,आवाज ऐकून परिसरातील नागरिकही जमा झाले. त्यांनी शोध घेतला असता त्यांना फरपट असलेल्या जागेवर सिद्धार्थच्या हातातून पडलेला पेन व काही अंतरावर रक्त सांडल्याचे आढळून आले.
Tragic scene in Kumset: Villagers mourn after a 7-year-old boy was killed in a leopard attack.

Tragic scene in Kumset: Villagers mourn after a 7-year-old boy was killed in a leopard attack.

Sakal

Updated on

ओझर: जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.कुमशेत गावातील ठाकर वस्तीवरील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने सावज बनवले. जुन्नर तालुक्यात बिबटयाने मुनुष्यावर हल्ला करून ठार केल्याची या महिन्यातील हि तिसरी घटना आहे.सदरची घटना बुधवारी ता.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com