

Rajuri Junnar Accident News Truck Collides With Two Wheeler on Kalyan Ahmednagar Highway Rider Killed Wife Injured
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील राजुरी गावच्या हद्दीत कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सह्याद्री महाविद्यालयासमोर सोमवारी (दि. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजू साहेबराव मुठे (रा. सातेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी जाईबाई मुठे गंभीर जखमी झाल्या आहेत.