esakal | Junnar : 'विघ्नहर'च्या गळीत हंगामाचे गव्हाणपुजन
sakal

बोलून बातमी शोधा

vighnahar sugar mill

Junnar : 'विघ्नहर'च्या गळीत हंगामाचे गव्हाणपुजन

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या गळीत हंगामाचे  गव्हाणपुजन आज शुक्रवारी ता.८ रोजी अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप तसेच आजी माजी संचालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. येत्या १५ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष गाळप सुरु होणार आहे.

हेही वाचा: Drug case: आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

शेरकर म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करत कारखाना आगामी गाळपासाठी सज्ज झाला आहे. कारखान्याने सुमारे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. ऊस तोडणी व गाळपाचे नियोजन केले आहे. नोंद झालेल्या सर्व ऊसाचे गाळप करण्यात येणार आहे. सभासद व बिगर सभासदांच्या सुमारे २५ हजार२६० एकर ऊसाची नोंद झाली आहे. उस उत्पादकानी संपूर्ण ऊस विघ्नहरला गाळपासाठी द्यावा,

ते म्हणाले की, कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. पुढील गाळप हंगामाचे सुरुवातीलाच इथेनॉल प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी साखर कारखानदारीला अडचणींचा ठरु पहात असलेल्या काळातही विघ्नहरचा ऊस गाळप हंगाम विशेष उंची गाठणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संचालक धनंजय डुंबरे यांनी अध्यक्षपदाची सुचना मांडली. देवेंद्र खिलारी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले. सेक्रेटरी अरुण थोरवे व सुहास शेटे यांनी सुत्र संचालन केले.

हेही वाचा: 'वेलकम बॅक, एअर इंडिया,' रतन टाटांचं खास टि्वट

याप्रसंगी सत्यशील शेरकर यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल विघ्नहर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरवर्षी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १०० व १११ मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्तीत जास्त ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टर कंत्राटदार अशा एकूण ८४ जणांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

१ ऑक्टोबर पासून स्मार्ट शेतकरी कार्डचे वितरण कारखाना कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. कर्मचारी आणि वाहतूकदार यांनाही एम्प्लॉयी स्मार्ट कार्ड व ट्रान्सपोर्टर स्मार्ट कार्ड देणार आहे. दिवाळीला देण्यात येणार्‍या साखरेचे वाटप २१ ऑक्टोबर पासून सुरु केले जाणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

loading image
go to top