'नॅशनल टेस्ट अभ्यास' अॅपवर विद्यार्थ्यांनी घेतल्या उड्या; अवघ्या 2 दिवसात ...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या सूचनेनुसार नॅशनल टेस्ट एजन्सीने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अॅप विकसित केले आहे. सध्या हे अॅप केवळ अँड्रॉइड वर्जनवर आहे. या अॅपद्वारे जेईई आणि नीट या परीक्षांसाठी रोज एक मॉक टेस्ट देण्यात येत असून ती पूर्णपणे मोफत आहे.

पुणे : नॅशनल टेस्ट एजन्सीने जेईई आणि नीट या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'नॅशनल टेस्ट अभ्यास' हे अॅप नुकतेच विकसित करण्यात आले आहे. अवघ्या चार दिवसात देशभरातील जवळपास दोन लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले असून आतापर्यत ८० हजार विद्यार्थ्यांनी टेस्ट दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या सूचनेनुसार नॅशनल टेस्ट एजन्सीने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अॅप विकसित केले आहे. सध्या हे अॅप केवळ अँड्रॉइड वर्जनवर आहे. या अॅपद्वारे जेईई आणि नीट या परीक्षांसाठी रोज एक मॉक टेस्ट देण्यात येत असून ती पूर्णपणे मोफत आहे.

माळेगाव कारखान्यातील अपघाताची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल   

जेईई आणि नीट या परीक्षा देताना काय खबरदारी घ्यावी, याचा पूर्ण सराव विद्यार्थ्यांना या अॅपवरील दररोज टेस्ट देताना होणार आहे.  अॅपवरील टेस्टमध्येही मूळ परीक्षेसाठी असणाऱ्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी लागू असणार आहेत. याद्वारे कोणता प्रश्न किती वेळात सोडवायचे याचा अंदाज विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट देताना येणार आहे. अॅपवरील टेस्ट पूर्ण झाल्यावर गुण तर मिळतीलच त्याशिवाय कोणत्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला किती वेळ लागला, हे देखील कळणार आहे. त्यामुळे वेळेचे सूयोग्य नियोजन करत परीक्षेमधील प्रश्न कसे सोडवायचे, याचा सराव याद्वारे विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका  

असे वापरा हे 'अॅप' :
- गुगल प्ले स्टोरवर 'नॅशनल टेस्ट अभ्यास' अॅप शोधा.
- नॅशनल टेस्ट एजन्सीच्या लोगोसह दिसणारे हे अॅप डाऊनलोड करा.
- अॅप ओपन झाल्यावर तुमचं नाव, शाखा, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी इत्यादी माहितीद्वारे 'साइन इन' करा.
- होमपेजवर तुम्हाला दररोज नीट, जेईई मेन दोन्हीच्या सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध
- हे अॅप 'आयओएस'वरही होणार उपलब्ध

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

असा होणार विद्यार्थ्यांना फायदा :
- कोणता प्रश्न किती वेळात सोडवायचे याचा येणार अंदाज
- आपल्या कमतरता आणि क्षमता विद्यार्थ्यांना समजणार
- एकूण आणि विषयानुसार स्कोअर कळणार
- विद्यार्थ्यांना दिवसभरात त्यांच्या सोयीनुसार कधीही देता येणार टेस्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In just four days nearly two lakh students downloaded the National Test Study app