Police Recruitment : शेतकऱ्याच्या मुलींचे अभिमानास्पद यश; पोलिस बनण्याचे स्वप्न उतरवले सत्यात

राळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच. परंतु, जिद्द बाळगली तर परिस्थिती हात टेकते, हे दाखवून दिले आहे राळे कुटुंबातील दोन्ही मुलींनी.
Ruchita Rale and Ankita Rale
Ruchita Rale and Ankita Ralesakal

कडूस - कोये (ता. खेड) येथील राळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच. परंतु, जिद्द बाळगली तर परिस्थिती हात टेकते, हे दाखवून दिले आहे राळे कुटुंबातील दोन्ही मुलींनी. मोठ्या जिद्दीने दोघी पोलिस झाल्या. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन लहान बहिणीने पोलिस बनण्याचे स्वप्न सत्यात उतरविले.

कोये येथील सुनीता आणि सुनील राळे या शेतकरी दांपत्याच्या तीन मुली आणि सर्वात लहान मुलगा असे सहा जणांचे कुटुंब. कोरडवाहू शेती, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी स्वतःची शेती संभाळण्याबरोबर सुनील दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून कामाला जायचे. चालक म्हणून काम करताना त्यांनी अल्पावधीत स्वतःचे चारचाकी मालवाहू घेत व्यवसाय उभा केला.

Ruchita Rale and Ankita Rale
Pune BRT : ‘बीआरटी’तील घुसखोरी ३० हजार चालकांना भोवली; सहा महिन्यांत १९ लाखाचा दंड वसूल

वडिलांची ही जिद्द आणि कष्ट करण्याची असलेली तयारी त्यांच्या मुलींनी लहान वयातच अनुभवलेली होती. तीच जिद्द पोरींमध्ये उतरली आहे. वडिलांच्या कष्टाची जाणीव धरीत मोठी मुलगी अंकिता २०१९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाली. यासाठी तिने खूप परिश्रम घेतले. मोठी बहीण अंकिताच्या पावलावर पाऊल ठेऊन लहान बहीण रुचिताने सुद्धा पोलिस होण्याचे स्वप्न बाळगले होते, ते तिने जिद्दीने पार पाडले.

रुचिता दररोज सकाळी मैदानी चाचणीच्या तयारीसाठी राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलच्या मैदानावर यायला लागायचे. पहाटे उठून दररोज कोये ते राजगुरुनगर असा सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास ती करायची. मैदानात सरावानंतर लेखी परिक्षेची तयारी ती करायची.

Ruchita Rale and Ankita Rale
Pune Road : पुण्यात अनेक रस्ते कागदावरच! मिसिंग लिंकबाबत सल्लागारांचा अहवाल सादर

परिस्थिती कितीही गरिबीची असुद्या. यशात तिचा अडसर ठरत नाही. जिद्द मनाशी बाळगली तर कोणीच अडवू शकत नाही, हे माझ्या दोन्ही मुलींनी सिद्ध करून दाखवलंय. मला माझ्या मुलींचा खूप अभिमान आहे.

- सुनील राळे, अंकिता, रुचिताचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com