Pune BRT : ‘बीआरटी’तील घुसखोरी ३० हजार चालकांना भोवली; सहा महिन्यांत १९ लाखाचा दंड वसूल

‘बीआरटी’मध्ये घुसखोरी करणे सुमारे ३० हजार वाहनचालकांना भोवले. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
pune brt route encroached vehicles
pune brt route encroached vehiclessakal

पुणे - ‘बीआरटी’मध्ये घुसखोरी करणे सुमारे ३० हजार वाहनचालकांना भोवले. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. केवळ बीआरटीमधून वाहन चालविणे एवढेच नाही. तर त्यांच्यावर विमा पॉलिसी नसल्यानेही कारवाई झाली. यात सुमारे १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बीआरटीमधील वाहनचालकांची घुसखोरी पीएमपीची डोकेदुखी बनली आहे. पीएमपी प्रशासनाकडे वॉर्डन नसल्याने घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई होत नव्हती. मात्र गेल्या काही महिन्यांत पीएमपी प्रशासनाने वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटीमधून जाणाऱ्या खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

pune brt route encroached vehicles
Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पालिका सज्ज; स्वच्छतेसाठी पथके आणि मार्गावर मोफत उपचारांची सुविधा

ऑक्टोबर २२ ते मार्च २३ दरम्यान वाहतूक पोलिसांनी सुमारे ३० हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून १८ लाख ८३ हजार ८५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशीच कारवाई पुणे शहरातदेखील सुरू असून त्याचा आकडा पीएमपी प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध झालेला नाही.

pune brt route encroached vehicles
Ashadhi Wari 2023 : वारीसाठी यंदाही खास मोबाईल ॲप

बीआरटीमधून प्रवास करण्याची परवानगी केवळ रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाड्यांनाच आहे. अन्य वाहनांना नाही, मात्र दुचाकीचालक सर्रास बीआरटी मार्गावरून जातात. याचा परिणाम पीएमपीच्या बस संचलनावर होतो. याशिवाय अपघाताचाही धोका निर्माण होतो.

- अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com